Neetu Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor)सोशल मीडियावर सक्रिय असतात. सिनेमा आणि व्यक्तीगत आयुष्याबाबतच्या अपडेट्स त्या सोशल मीडियावरुन शेअर करत असतात. फिल्म फेअर अवार्ड्सचा (Filmfare Awards 2024) सोहळा रविवारी (दि.29) पार पडला. यावर्षी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt)या दोघांनाही फिल्म फेअर अवार्ड (Filmfare Awards 2024) मिळाला आहे. मुलगा आणि सून दोघांनाही फिल्मफेअर मिळाल्याने नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावत नाहीये. त्यांनी सोशल मीडियावर आलीया आणि रणबीरचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केलाय. शिवाय, दोघांचे अभिनंदनही केले आहे. 


इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद 


रणबीर आणि आलीयाला फिल्मफेअर मिळताच नीतू कपूर यांची कळी खुलली आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन रणबीर-आलीयाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन लिहिताना नीतू कपूर म्हणाल्या, "संजू आणि राणी या सिनेमांतील रणबीर आणि आलीयाचा उत्कृष्ट अभिनयासाठी 2019 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तेव्हा मी दोघांसाठी प्रार्थना करत होते. 'अॅनिमल' आणि 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी'ला अवार्ड मिळाला. त्याबद्दल तुमचे अभिनंदन. मला तुमचा अभिमान वाटतो."  


आलिया आणि रणबीरला फिल्मफेअर 


गुजरातच्या गांधीनगरमध्ये फिल्मफेअर अवार्ड्च्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला 27 जानेवारी 2024 ला सुरुवात झाली. दरम्यान, रविवारी या अवार्ड्चे वितरण करण्यात आले. फिल्मफेअरमध्ये बेस्ट अभिनेत्याचा अवार्ड रणबीर कपूरला मिळाला आहे. त्याला अॅनिमल या सिनेमासाठी हा अवार्ड देण्यात आला. तर फिमेलमध्ये हा अवार्ड अभिनेत्री आलिया भटला देण्यात आला. आलियाला 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी'ला या सिनेमासाठी अवार्ड देण्यात आला. 


रणबीरकडून आलियाचे कौतुक 


फिल्मफेअर अवार्डच्या सोहळ्यातील रणबीर आणि आलियाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोघेही अॅनिमल या सिनेमातील जमाल कडू या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आलिया आणि रणबीरच्या डान्सला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. दोघांनीही बॉबी देओलप्रमाणे डोक्यावर ग्लास ठेऊन डान्स केला आहे. 










इतर महत्वाच्या बातम्या 


Fighter Box Office Collection : हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; चार दिवसांत पार केला 100 कोटींचा टप्पा