Fighter Box Office Collection Day 4 : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा 'फायटर' (Fighter) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे.


'फायटर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Fighter Box Office Collection)


'फायटर' हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 22.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 39.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 27.5 कोटी आणि चौथ्या दिवशी 28.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 118 कोटींचा गल्ला जमवला आहे.



  • पहिला दिवस : 22.5 कोटी

  • दुसरा दिवस : 39.5 कोटी

  • तिसरा दिवस : 27.05 कोटी

  • चौथा दिवस : 28.50 कोटी

  • एकूण कमाई : 118 कोटी


'पठाण' (Pathaan) या ब्लॉकबस्टरर सिनेमानंतर सिद्धार्थ आनंदचा 'फायटर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'फायटर' हा भारताचा पहिला एरियल अॅक्शनपट आहे. सिनेप्रेक्षकांच्या हा सिनेमा पसंतीस उतरला आहे. वीकेंडला या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. देशभरात हा सिनेमा 4300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.




'फायटर'चा येणार सीक्वल? 


पिंकव्हिला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ आनंद म्हणाला,"एखाद्या कलाकृतीचा दुसरा भाग बनवायला मला भीती वाटते. एखाद्या कलाकृतीचा एकच भाग बनवणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये माझा समावेश होतो. नव्या गोष्टीवर काम करायला मला आवडतं. त्यामुळे या सिनेमाच्या सीक्वेलचा अद्याप मी विचार केलेला नाही. कंफर्ट झोनमध्ये राहायला मला आवडत नाही". 


'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अनिल कपूर, करण सिंह ग्रोवरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता हा सिनेमा शाहरुखच्या जवानचा रेकॉर्ड ब्रेक करणार का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'फायटर' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हृतिक-दीपिकाची शानदार केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.


संबंधित बातम्या


Fighter Movie: हृतिकचा 'फायटर' रिलीज होण्याच्या दोन महिन्यांपूर्वी मृत्यू; चित्रपटात दहशतवादी झालेला 'तो' अभिनेता कोण?