एक्स्प्लोर

CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

या चित्रपटांनी केवळ मनोरंजनच केले नाही, तर विद्यार्थ्यांचा रोष, संघर्ष, विद्यार्थी राजकारण आणि परिवर्तनासाठीची लढाई मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडली.

CJP Protest Films Bollywood: देशात NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांची आंदोलने, सोनम वांगचुक यांचे आंदोलन आणि शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची युवकांची मागणी यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या विषयाकडे वेधले गेले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही विद्यार्थी आंदोलनांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील काही चित्रपट पुन्हा चर्चेत आले आहेत. बॉलिवूडने गेल्या काही वर्षांत सशक्त कथांच्या माध्यमातून आंदोलन, विद्यार्थी चळवळी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे यांसारख्या विषयांना हाताळले आहे. या चित्रपटांनी केवळ मनोरंजनच केले नाही, तर विद्यार्थ्यांचा रोष, संघर्ष, विद्यार्थी राजकारण आणि परिवर्तनासाठीची लढाई मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडली. जाणून घेऊया अशाच 8 चित्रपटांविषयी...

रंग दे बसंती (2006)

विद्यार्थी आंदोलनांवर आधारित सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'रंग दे बसंती'चा उल्लेख आवर्जून करावा लागतो. या चित्रपटात काही बेफिकीर महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या मित्राच्या मृत्यूनंतर भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आवाज उठवतात. त्यांचा हा विरोध हळूहळू मोठ्या जनआंदोलनाचे रूप धारण करतो. आज युवक शिक्षण व्यवस्था आणि सरकारच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करत असताना हा चित्रपट अधिकच टोकदार होतो.


CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

युवा (2004)

मणिरत्नम दिग्दर्शित 'युवा' हा चित्रपट विद्यार्थी राजकारणाची ताकद दाखवतो. चित्रपटात अजय देवगण एका जोशपूर्ण विद्यार्थी नेत्याच्या भूमिकेत दिसतो. तो युवकांना केवळ आंदोलन करण्याचे नव्हे, तर राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन व्यवस्था बदलण्याचे आवाहन करणारा आहे. बदल फक्त घोषणांनी होत नाही, तर सहभागातूनही घडतो अशी मांडणी या चित्रपटातून करण्यात आलीय.


CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

हजारों ख्वाहिशें ऐसी (2005)

सुधीर मिश्रा दिग्दर्शित हा चित्रपट 1970 च्या दशकातील राजकीय अस्थिरता आणि विद्यार्थी आंदोलनांची कथा मांडतो. सेंट स्टीफन्स कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी युवक कशा प्रकारे स्वतःचे आयुष्य पणाला लावतात, हे यात दाखवले आहे. नक्षलवादी चळवळ आणि विद्यार्थ्यांमधील राजकीय जाणीव यांचे गंभीर चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते.


CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

गुलाल (2009)

अनुराग कश्यप दिग्दर्शित 'गुलाल' या चित्रपटात विद्यापीठातील राजकारण, सत्तेची लालसा, फुटीरतावाद आणि विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष वास्तववादी पद्धतीने दाखवण्यात आला आहे. विद्यार्थी आंदोलन केवळ आदर्शवादापुरते मर्यादित राहत नाही, तर अनेकदा सत्तेच्या राजकारणाचाही भाग बनते, हे या चित्रपटातून स्पष्ट होते.


CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

हासिल (2003)

इलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणावर आधारित'हासिल' हा चित्रपट विद्यार्थी संघ निवडणुकांच्या माध्यमातून राजकारण, गुन्हेगारी आणि युवकांचा संघर्ष उलगडतो. शैक्षणिक संस्थांमधील राजकारणावर बाहुबल आणि गुन्हेगारीचा कसा प्रभाव पडतो आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर काय परिणाम होतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.


CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

आरक्षण (2011)

प्रकाश झा दिग्दर्शित 'आरक्षण' हा चित्रपट शिक्षण व्यवस्था, सामाजिक न्याय आणि आरक्षणासारख्या संवेदनशील विषयांवर आधारित आहे. आरक्षण धोरणावरून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला विरोध, आंदोलने आणि समाजातील वाद या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. शिक्षणाशी संबंधित निर्णयांचा युवकांवर आणि समाजावर किती मोठा परिणाम होतो, हे या चित्रपटातून दिसून येते.


CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

सत्याग्रह (2013)

प्रकाश झा दिग्दर्शित 'सत्याग्रह' हा चित्रपट भ्रष्टाचार, जनआंदोलन आणिसत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा आहे.अमिताभ बच्चन, अजय देवगण, करीना कपूर खान, अर्जुन रामपाल आणि मनोज बाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अन्यायाविरोधात उभा ठाकलेला एक ज्येष्ठ समाजसेवक जनतेला सोबत घेऊन मोठं आंदोलन छेडतो. गांधीवादी विचारसरणी आणि लोकशक्तीच्या जोरावर व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणारा हा चित्रपट आजच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही तितकाच समर्पक वाटतो.


CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

हुडदंग (2022)

'हुडदंग' हा चित्रपट 1990 मधील मंडल आयोग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. इलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरकारी निर्णयांविरोधात देशभर उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनांचे चित्रण यात करण्यात आले आहे. आज शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा आंदोलने होत असताना हा चित्रपट त्या ऐतिहासिक संघर्षांची आठवण करून देतो.


CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget