Navratri 2022 : नवरात्रीचा (Navratri 2022) उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच तरूणाईची गरब्यासाठी लगबग सुरु झाली आहे. वेगवेगळे कलरफुल कपडे विकत घेण्याबरोबर गरब्यासाठी बेस्ट ठिकाण कोणतं याच्या सगळेच शोधात असतील. तर चिंता करू नका. या ठिकाणी आम्ही तुम्हाला मुंबईतील गरबा खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काही बेस्ट जागांची माहिती देणार आहोत. या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर अगदी मनमुरादपणे गरब्याचा आनंद लुटू शकता. 


मुंबईतील दांडिया खेळण्यासाठी 7 बेस्ट ठिकाणं : 


कै. प्रमोद महाजन संकुल - बोरीवली पश्चिम (Pramod Mahajan Sankul, Borivali West) 


मुंबईतील बोरीवली या ठिकाणी होणारा गरबा हा सर्वात प्रसिद्ध गरबांपैकी एक आहे. तसे, बोरीवलीत अनेक ठिकाणी गरबा खेळला जातो. मात्र, प्रमोद महाजन संकुलात फाल्गुनी फाटकची विशेष उपस्थिती असते. फाल्गुनीच्या गाण्यांवर गरब्याचे ठुमके मारताना तरूणाईत एक वेगळीच गंमत असते. 


द एकर्स क्लब (क्रिस्टल हॉल), चेंबूर, मुंबई (The Acres Club, Chembur, Mumbai) 


चेंबूर हे ठिकाण गरब्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणी एका हॉलमध्ये हा गरबा खेळला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या ठिकाणी गरब्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. या हॉलमध्ये फक्त 40 लोकांचीच उपस्थिती स्विकारण्यात येते. 


पोलिस परेड ग्राउंड, घाटकोपर (पूर्व) (Police Parade Ground, Ghatkopar (East) 


घाटकोपरच्या पूर्व उपनगरातील पोलीस परेड ग्राउंड हे या वर्षातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. घाटकोपर नवरात्री महोत्सव हा केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतभर सर्वात जास्त उत्सुक असलेला कार्यक्रम आहे.


कुठे: पोलीस परेड ग्राउंड, घाटकोपर (पूर्व), मुंबई


गोरेगाव क्रीडा संकुल, गोरेगाव (पश्चिम) (Goregaon Sankul, West)


संकल्प दांडिया नवरात्री गट दरवर्षी त्यांचा कार्यक्रम गोरेगावमध्ये आयोजित करतो आणि हा आणखी एक पारंपारिक आवडता आहे. संकल्प हे फाल्गुनी पाठकचे अनेक वर्ष 'होम ग्राउंड' होते. आणि मुंबईतील दांडियाचे मुख्य स्थान बनविण्यासाठी स्टार कलाकार मोठ्या संख्येत उपस्थित असतात. 


कुठे:  गोरेगाव स्पोर्ट्स ग्राउंड, गोरेगाव-मालाड लिंक रोड, मुंबई


कोरा केंद्र मैदान, बोरिवली (पश्चिम), मुंबई (Kora Kendra Ground, Borivali (West) 


हे मुंबईतील सर्वात सुंदर आणि महागड्या ठिकाणांपैकी एक आहे. पासेसची किंमत खूप जास्त असली तरी, येथे परफॉर्म करणार्‍या बँडच्या संख्येमुळे तुम्हाला पैसे खर्च केल्याबद्दल खंत वाटणार नाही. त्यामुळे या गरब्याला नक्की कोरा केंद्रला भेट द्या. 


कुठे : कोरा केंद्र मैदान, बोरिवली (पश्चिम), मुंबई


पुष्पांजली गार्डन ग्राउंड, बोरिवली (पश्चिम) (Pushpanjali Garden Ground, Borivali (West) 


प्रसिद्ध बहीणींची जोडी प्रीती आणि पिंकी दरवर्षी त्यांच्या आयकॉनिक बँडसह येथे परफॉर्म करतात. शहराच्या आजूबाजूचे लोक या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी येतात. वयाच्या पाचव्या आणि सातव्या वर्षापासून ही जोडी देशभर आपला परफॉर्मन्स देत आहे. दरवर्षी या बहिणींची तरूणाई आतुरतेने वाट बघत असते. त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणचा गरबा अनुभवा.   


कुठे: पुष्पांजली गार्डन ग्राउंड, बोरिवली (पश्चिम), मुंबई


महत्वाच्या बातम्या :