Navratri 2022 : 26 सप्टेंबरपासून नवरात्री (Navratri 2022) उत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रौ उत्सव भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोरोना काळात भारतात अनेक सणांवर निर्बंध लादले गेले होते. मात्र, यावर्षी सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. नवरात्रीतील गरबा (Garba) हा सगळ्यांच्याच आकर्षणाचा एक भाग असतो. विशेष म्हणजे, ज्यांना अगदी नाचता येत नाही तेसुद्धा देवीच्या या उत्सवात आनंदाने सहभागी होतात. यामध्ये बॉलिवूडच्या हिंदी गाण्यांबरोबरच मराठी गाण्यांचादेखील ठसका अनुभवायला मिळतो. अशाच काही मराठी चित्रपटातील गरब्यांची गाणी आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. 


1. अष्टमी : धर्मवीर - सुप्रसिद्ध धर्मवीर (Dharmaveer) चित्रपटातील 'अष्टमी' हे देवीचा जागर करणारं गाणं आहे. या गाण्यातील रिदम, कोरीओग्राफी तसेच कलाकारांची वेशभूषा विशेष लक्षणीय आहे. यंदाच्या नवरात्रीत हे गाणं वाजवून तुम्ही नक्कीच नवरात्रीत नवी रंगत आणू शकता. 



2. तमाशा लाईव्ह : रंग लागला - अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेला 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील रंग लागला ह्या गाण्याने तर प्रेक्षकांना भुरळच पाडली. विशेष म्हणजे हे गाणं, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून अनेकांनी या गाण्यावर रिल्स देखील बनवले आहेत. 



3. गुलाबाची कळी - तू ही रे - अनेक गरब्यांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये 'गुलाबाची कळी' या गाण्याचा देखील समावेश आहे. स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रीत हे गाणं आहे. 



4. अंबे कृपा करी : वंशवेल - देवीचा जागर करणाऱ्या गाण्यांमध्ये 'अंबे कृपा करी' या गाण्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. या गाण्यात एक नाही, दोन नाही तर तब्बल 13 अभिनेत्री एकाच वेळी एका मंचावर देवीचा जागर करताना दिसतात. हे गाणंदेखील नवरात्रीची रंगत वाढवणारं आहे. 



सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांनी गायलेलं 'देवीचा नावाचा जागर' हे देवीचा जागर करणारं गाणंदेखील तुम्ही या नवरात्रीत वाजवू शकता. हे गाणं गरब्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे देवीचा जागर करणारी ही मराठी गाणी जर तुम्ही या नवरात्रीत लावली तर नवरात्रीची रंगत आणखी वाढेल यात शंका नाही. 


महत्वाच्या बातम्या :