Nana Patekar : मागील काही दिवसांपासून अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या राजकारणातल्या एन्ट्रीच्या चर्चांनी चांगलाच जोर धरलाय. त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या एका भाषणातून सरकारवरही नाराजी व्यक्त केली. तसेच अजित पवारांकडून (Ajit Pawar) शिरुर मतदारसंघासाठी नाना पाटेकर यांना ऑफर देण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात होतं. त्यामुळे नाना पाटेकर लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण या सगळ्यावर भाष्य करत नाना पाटेकर यांनी या सगळ्या चर्चांचं खंडण केलं आहे. 


मला ऑफर असली तरी मी ही ऑफर स्वीकारणार नसून राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांनी त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना तर पूर्णविराम दिला आहे. पण नाना पाटेकरांच्या आणखी एका वक्तव्यामुळे साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. मला राजकारण कधीही जमणार नाही, असंही नाना पाटेकर यांनी यावेळी म्हटलं. तसेच मी जरी उभं राहिलो तर मी लोकांकडे जाऊन कधीही मतं मागणार नाही कारण जर तुमचं काम चांगलं असेल तर लोकांकडे जाऊन तुम्हाला मतं मागण्याची गरज लागत नाही. नानांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी सरकारवर निशाणा साधला असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 


नाना पाटेकर यांनी काय म्हटलं?


नाना पाटेकर यांनी तुम्ही इतकं काम करत आहात तर राजकारणात येण्याचा विचार का करत नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नाना पाटेकर यांनी म्हटलं की, मी जर सत्तेत आलो तर मला काम करता येईल असं तुम्हाला वाटतं का? सत्तेत आपली सगळी मंडळी आहेत. पण सगळ्यांना हात जोडणं मला जमतं. मी कधीही उभा राहणार नाही, ही गोष्ट वेगळी पण जरी मी उभा राहिलो तरी मी जनतेकडे हात जोडून कधीही मतं मागणार नाही. मी नुसतं निवडणुकांसाठी उभा आहे, या गोष्टीवर मला मतं मिळायला हवीत. त्यामुळे आपलं काम इतकं चांगलं असावं आणि त्याबद्दल लोकांना विश्वास असायला हवा, असंही यावेळी नाना पाटेकरांनी म्हटलं आहे. 


आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेक आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांनी आपली राजकारणातील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली. नाना पाटेकर यांनी म्हटले की, ⁠मला सर्वच पक्षातून ॲाफर आहे. पण मला ते जमणार नाही, ⁠लोकांनी ठरवले पाहिजे. ⁠मी मूळात राजकारणात जावू इच्छित नसल्याचेही त्यांनी म्हटले. पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना नाना पाटेकर यांनी मला कळवा कुठून निवडणूक लढवायची असा उलट प्रश्न केला.⁠कितीही प्रश्न विचारले तरे तुम्ही मला पकडू शकत नाही असेही नाना पाटेकर यांनी म्हटले. 


नाम फाऊंडेशनची सुरुवातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी झाल्या आहेत. ⁠हमी भाव योग्य मिळाला तरच आत्महत्या रोखतां येतील. ⁠या सरकारकडून अपेक्षा असल्याचे सांगतया गोष्टी चुटकी सरशी सुटतील असं नाही हेदेखील नाना पाटेकर यांनी नमूद केले. 


ही बातमी वाचा : 


Nana Patekar On Politics :  मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर, निवडणूक लढवण्यावर नाना पाटेकर यांचे मोठं वक्तव्य