एक्स्प्लोर

Nana Patekar: ‘आग लागण्याची वाट पाहायची का?’ जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पाटेकर का संतापले होते? नेमकं काय घडलं होतं?

Nana Patekar: 2015 मध्ये जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना, ‘आग लागण्याची वाट पाहायची का?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला होता

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच सामाजिक प्रश्नांवर परखड भूमिका मांडण्यासाठीही नाना पाटेकर ओळखले जात होते. शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला मिळणारा भाव आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांची परिस्थिती या विषयांवर त्यांनी अनेकदा आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. 2015 मध्ये जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना, ‘आग लागण्याची वाट पाहायची का?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला होता. नानांच्या निधनानंतर त्यांच्या त्या भाषणाची पुन्हा चर्चा होत आहे. 

25 ऑक्टोबर 2015 रोजी जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘नाम फाऊंडेशन’च्या वतीने खान्देशातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदतवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नाना पाटेकर यांच्या हस्ते 353 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत एकूण सुमारे 52 लाख 95 हजार रुपयांची मदत करण्यात आली होती. मात्र, शेतकरी कुटुंबांचा संघर्ष केवळ आर्थिक मदत देऊन संपणार नाही, याची जाणीव नाना पाटेकर यांनी त्या वेळी करून दिली होती. संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार मिळणे, त्यांचा सन्मान राखला जाणे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकवलेल्या मालाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Nana Patekar: ‘सहानुभूती नको, आधार द्या’; शेतकरी कुटुंबांना धीर

या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबातील अनेक जबाबदाऱ्या शिल्लक असताना आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने मागे राहिलेल्या कुटुंबीयांना किती मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्याच्या पत्नीला, आईला आणि मुलांना दुःख बाजूला ठेवून पुन्हा आयुष्य उभे करावे लागते. गेलेली व्यक्ती परत येणार नसली, तरी तिच्या मागे राहिलेल्या कुटुंबीयांनी जगण्यासाठी उभे राहणे गरजेचे आहे, असा संदेश त्यांनी दिला होता. शेतकरी कुटुंबांना केवळ सहानुभूती दाखवून किंवा पोकळ आश्वासने देऊन उपयोग नाही, तर त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहण्याची गरज असल्याचे नाना यांनी अधोरेखित केले होते. ‘रडू नका, तर लढा’, असे आवाहन करत त्यांनी संकटात खचून न जाता पुन्हा उभे राहण्याचा संदेश दिला होता. 

Nana Patekar: शेतमालाच्या भावावरून नाना पाटेकर संतापले; नेमका सवाल काय होता?

या भाषणातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे शेतमालाला मिळणारा भाव. इतर वस्तूंच्या किमती आणि विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांचे पगार वाढत असताना शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मिळणाऱ्या किमतीत त्या तुलनेत पुरेशी वाढ झालेली नाही, असे नाना पाटेकर यांनी म्हटले होते. "गुरुजींचा पगार सातव्या वेतन आयोगानुसार 35 हजार झाला. सोन्याच्या किमतीत 82 पटीने वाढ झाली. पगार अडीचशे पटीने वाढले; परंतु शेतकऱ्यांच्या मालाची किंमत फक्त आठ पटीने वाढली," असा दावाही पाटेकर यांनी त्या वेळी केला होता. शेतमालाच्या दरातील ही तफावत अधोरेखित करत त्यांनी, "आग लागण्याची वाट पाहायची का?" असा संतप्त सवाल उपस्थित केला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Embed widget