Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding Invitation : साऊथ अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलीपाला सध्या चर्चित सेलिब्रिटी कपल आहे. नागा चैतन्य आणि शोभिताने ऑगस्ट महिन्यात गुपचूप साखरपुडा उरकला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. आता या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे. नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका लीक झाली असून त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या वेडिंग कार्डचा एक लीक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
नागा चैतन्य-शोभिताच्या लग्नाची तारीख ठरली!
नागा चैतन्य आणि शोभिताचं वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. शोभिता आणि नागा चैतन्य यांच्या लग्नपत्रिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच त्यांच्या लग्नाची तारीखही लीक झाली आहे. शोभिता आणि नागा चैतन्यच्या नात्याची घोषणा झाल्यानंतर दोघांनी साखरपुडा केल्यानंतर आता हे कपल लग्न कधी करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता या दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. हे कपल डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.
लग्न पत्रिका सोशल मीडियावर लीक
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये लग्नाची तारीखही लिहिलेली दिसत आहे. लग्नपत्रिकेसोबतच या जोडप्याने पाहुण्यांसाठी खास गिफ्ट बास्केटही तयार केल्या आहेत. सानुकूलित बांबूच्या टोपलीमध्ये फुले, एक छापील कापड, अन्नाची पाकिटे, एक पारंपारिक स्क्रोल आणि काही लहान टोकन्स होती.
डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार?
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, त्यांच्या लग्नाची तारीख आणि लग्नपत्रिकेचा फोटोही व्हायरल झाला आहे. यासोबतच पाहुण्यांना पाठवलेल्या भेटवस्तूंची झलकही पाहायला मिळाली. मीडिया रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 4 डिसेंबरला लग्न करणार आहेत. हे जोडपे हैदराबादमध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे.
पाहा व्हायरल लग्नपत्रिका
महत्त्वाच्या इतर बातम्या :