Sharad Pawar: आपल्याला जे जे सोडून गेले आहेत यांचे आता काय करायचे असा सवाल शरद पवारांनी (Sharad Pawar) आज सभेतील गर्दीला केला. यावेळी जोरदार पाडायचे असे उत्तर गर्दीतून आले. माढा विधानसभा मतदारसंघाचे (Madha Assembly Constituency) शरद पवार गटाचे उमेदावर अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजीत केलेल्या टेंभिुर्णीतील सभेत ते बोलत होते. सोडून गेलेल्यांना असं तसं पाडायचं नाही तर महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. लोळत पाडा. कोणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही असा टोला देखील शरद पवार यांनी नाव न घेता आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे यांना लगावला.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी 1980 च्या विधानसभा निवडणुकीचा किस्सा देखील सांगितला. 1980 साली माझे असेच 58 आमदार निवडून आले होते. मी तेव्हा परदेशात गेलो आणि परत आल्यावर पाहतो तर 58 पैकी 52 आमदार मला सोडून गेले होते. मग तीन वर्ष मी पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढला आणि सर्व नवीन नवीन दमाचे उमेदवार उभे केले. मला सोडून गेलेल्या 52 पैकी एकही आमदार परत निवडून आला नाही असेही शरद पवार म्हणाले. मग आता हे जे सोडून गेलेले आहेत त्यांचे काय करायचे? असा जनतेला सवाल करत शरद पवार गेलेले सगळे पाडायचे म्हणाले.
सोडून गेलेल्यांना त्यांची जागा त्यांना दाखवलीच पाहिजे
आम्हाला 40 वर्ष साथ दिली म्हणतात पण ते आता सोडून गेले आहेत. त्याचं काय करायचं? असा सवाल पवारांनी सभेत केला. यावेळी त्यांना पाडायचे असे जनतेतून उत्तर आहे. यावेळी पवार म्हणाले की त्यांची जागा त्यांना दाखवलीच पाहिजे. जागा दाखवायची असेल तर साधसुध पाडायचं नाही. लोळत पाडायचं संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे असे शरद पवार म्हणाले.
मोदींनी उद्योगपतींचे 16000 कोटींचे कर्ज माफ केले
हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही शरद पवार म्हणाले. मोदींनी उद्योगपतींचे 16000 कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे पाच ते दहा हजारांचे कर्ज माफ केले नाही. या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नसल्याचे शरद पवार म्हणाले. 2 वर्षात महाराष्ट्रात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. म्हणजेच दर तासाला पाच महिलांवर या महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रातील 64 हजार महिला आणि लेकी बेपत्ता आहेत. शिंदे-फडणवीस अशा राज्यकर्त्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही असेही पवार म्हणाले. तसेच 62 लाख मुले राज्यात बेरोजगार आहेत.
महत्लाच्या बातम्या: