Bollywood Love Story : ‘या’ सुपरस्टारने लंच ब्रेकमध्ये गुपचूप आटोपलं लग्न, वाचा लव्हस्टोरी

Dev Anand Love Story : अभिनेते देव आनंद यांचा अभिनय आणि त्यांची स्टाईलचे अनेक चाहते होते. तरुणींच्या त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायच्या.

Dev Anand Love Story

1/10
देव आनंद यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणी तासनतास रांगेत राहायच्या. देव आनंदही खूप रोमँटिक होते. त्यांच्या प्रेमाचे किस्से आजही चर्चेत आहेत
2/10
70-80 च्या दशकातील सुपरस्टार देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांची प्रेमकहाणी खूप चर्चेत होती.
3/10
देव आनंद याचं पहिलं प्रेम अपूर्ण राहिलं. देव आनंद हिंदू आणि सुरैय्या मुस्लिम असल्यामुळे त्यांचं नात तुटलं. यानंतर देव आनंद यांच्या आयुष्यात कल्पना कार्तिकने प्रवेश केला.
4/10
1954 साली आलेल्या 'टॅक्सी ड्रायव्हर' चित्रपटाच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली.
5/10
चित्रपटाच्या शूटींगदरम्यान या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
6/10
एक दिवस लंच ब्रेकमध्ये दोघांनी गुपचूप लग्न केलं.
7/10
तुदोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न करण्याची वाट पाहिली नाही आणि शूटिंगदरम्यान लंच ब्रेकमध्ये कोर्टात जाऊन लग्न केले.
8/10
कल्पना यांनी देव आनंद यांची अखेरपर्यंत साथ निभावली.
9/10
देव आनंद आणि कल्पना यांना सुनील आनंद आणि देवीना आनंद ही दोन मुले झाली.
10/10
देव आनंद आणि कल्पना यांची प्रेमकहाणी बॉलिवूडच्या अजरामर प्रेमकहाणींपैकी एक आहे.
Sponsored Links by Taboola