Dog Shubh-Ashubh Impact : ज्या पद्धतीने ग्रह आणि नक्षत्रांची चाल संभावित घटनेची माहिती देते. त्याचप्रमाणे, गाय, श्वान (Dog), मांजर आणि कावळ्यासारखे अन्य अनेक जीव जंतूंचे व्यवहार, चाल आणि हावभावसुद्धा आपल्याला शुभ आणि अशुभ असे संकेत देतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून अनेकदा आपण ऐकलं असेल की, श्वान किंवा मांजरीच्या रस्ता ओलांडल्याने आपली ठरवलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता फार कमी होते.
जीवाच्या बाबतीत श्वानाचं स्थान फार महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणा आणि सतर्कतेमुळे अनेकांनी श्वान पाळण्यास सुरुवात केली आहे. कारण व्यक्तीबरोबर घडणारी शुभ-अशुभ घटना आधी प्राण्यांना कळते. त्यानुसार या ठिकाण आपण श्वानाशी संबंधित काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत.
डोळे वटारून पाहणे
समजा, जर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं असेल किंवा यात्रेला जायचं असेल आणि श्वान जर तुम्हाला डोळे वटारून पाहात असेल तर तुम्ही ज्या कार्यासाठी घराबाहेर जात आहात ते कार्य तुमचं निश्चित पूर्ण होईल असं समजा.
मान उंचावून पाहणे
श्वानाचं तुमच्याकडे मान उंचावून पाहणे हे देखील एक शुभ संकेत आहे. हा असा संकेत दर्शवतो की तुम्ही ज्या कार्यासाठी घराबाहेर जात आहात ते कार्य लवकरच पूर्ण होईल.
तुमच्या पायांवर लोटांगण घालणे किंवा प्रसन्न दिसणे
जर श्वान तुमच्या पायांवर लोटांगण घालत असेल तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे असं समजा. तसेच, तुमचं काम पूर्ण होण्याचा हा संकेत आहे.
जमीन खोदणे
जर श्वानाद्वारे चांगल्या जमिनीच्या ठिकाणी जमिन खोदण्याचं काम करत असेल तर लवकरच तुम्हाला धनप्राप्ती मिळण्याचे संकेत आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: