OTT Series : कोरोना महामारीमुळे थिएटर सध्या बंद पडले होते. त्यामुळे ओटीटीला (OTT) सुगीचे दिवस आले. अनेक चित्रपटांनी प्रदर्शनासाठी ओटीटीचा मार्ग स्वीकारला. केवळ चित्रपटच नाही तर, ओटीटीवर अनेक मनोरंजक वेब सिरीज देखील प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यातही पॉलिटिकल ड्रामा असणाऱ्या सिरीजना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तुम्ही देखील अशा कथानकांचे फॅन असाल, तर ‘या’ सिरीज आवर्जून पाहाच..


महारानी (Maharani)  


1990च्या दशकातील बिहारचे राजकारण मनोरंजक, आकर्षक होते. ‘महारानी’ या वेब सिरीजच्या कथेत त्याच  काळातील काही संदर्भ घेऊन राजकारणातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बिहार राजकरणामध्ये स्वारस्य असलेल्यांना ही सिरीज नक्की आवडेल. परंतु, ज्यांना राजकारणाच्या शाळेतून काही धडे घ्यायचे आहेत, त्यांनी देखील ही सिरीज आवर्जून पाहावी.


हाऊस ऑफ कार्ड्स (House of Cards)


नेटफ्लिक्सवर 2013मध्ये आलेली ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ ही मालिका अमेरिकेचे राजकारण दाखवते. 6 भागांच्या या सिरीजमध्ये राजकारणापासून ते महापौरपदाच्या लढतीपर्यंतची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. सिरीजच्या 5 भागांमध्ये अभिनेता केविन स्पेसी मुख्य भूमिकेत दिसला होता. पण, #MeTooमध्ये नाव आल्यानंतर त्याला सिरीजमधून काढून टाकण्यात आले.


तांडव (Tandav)


जेव्हा राजकारण लोकांच्या रक्तातच असते, तेव्हा त्यांची कथा जगासमोर आल्यावर नक्कीच गाजते. ‘तांडव’ ही वेब सिरीज अशी कथा दाखवण्याची रिस्क घेते आणि सुरुवातीला गडबड झाल्यानंतर हळूहळू सावरते. राजकीय कॉरिडॉर आणि पात्रांच्या कथा यात पाहायला मिळतात.


सिटी ऑफ ड्रीम्स 2 (City Of Dreams 2)


‘सिटी ऑफ ड्रीम्स 2’ ही वेब सिरीज महाराष्ट्राच्या राजकीय पार्श्वभूमीवर असून, त्यात गायकवाड या राजकीय कुटुंबातील फसवणूक, रक्तपात दाखवला आहे. हा सीझन स्वप्नांच्या नगरी, मुंबईत होत असलेल्या राजकारण आणि ड्रामाने भरलेला आहे.


डार्क 7 व्हाईट (Dark 7 White)


‘डार्क 7 व्हाईट’ या सिरीजमध्ये राजस्थानच्या एका राजकीय घराण्याची कथा दाखवण्यात आली आहे. अल्ट बालाजीच्या या सिरीजमध्ये राजकारणाचा बुद्धिबळ दाखवण्यात आला असून, राजकीय सिंहासनाची लढाई पाहायला मिळते.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha