एक्स्प्लोर

Mushtaq Khan Death : 'मेरी एक टांग नकली है...' डायलॉग गाजवणारा दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड, कर्करोगाने निधन

Mushtaq Khan Death : 'वेलकम' चित्रपटात आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवणारे दिग्गज अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Mushtaq Khan Passed Away : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुःखाद बातमी समोर आली आहे. 'वेलकम' चित्रपटातील 'मेरी एक टांग नकली है...' हा गाजलेला डायलॉग आणि आपल्या अफलातून कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान (Mushtaq Khan) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी गुरुवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही काळापासून लिव्हर कॅन्सरशी झुंज देत होते.

Mushtaq Khan Death Cause : दीर्घ आजाराने निधन

मुश्ताक खान यांच्या निधनाची माहिती त्यांचे बिझनेस पार्टनर शिवम यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्ताक खान गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना आधी फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) झाला होता, ज्यावर उपचार घेतल्यानंतर ते पूर्णपणे ठीक झाले होते. मात्र, 8 दिवसांपूर्वी कर्करोग पुन्हा उफाळून आला आणि त्यांची प्रकृती चिंताजनक बनली.

डॉक्टरांच्या मते त्यांचा कर्करोग अंतिम टप्प्यात (Last Stage) पोहोचला होता. गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आयुष्यभर प्रेक्षकांना हसवणाऱ्या मुश्ताक खान यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील एका अष्टपैलू कलाकाराचा अंत झाला आहे.

Mushtaq Khan Funeral : शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार

मुश्ताक खान यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी, 25 सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईतील यारी रोड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार (सुपुर्द-ए-खाक) केले जातील.

Mushtaq Khan Career Movies : 'आशिकी' ते 'स्त्री 2', आठवणीत राहणाऱ्या भूमिका

मुश्ताक खान यांनी हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक आणि विनोदी कलाकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या:

लोकप्रिय चित्रपट: 'वेलकम' (Welcome), 'आशिकी' (Aashiqui), 'मुझसे शादी करोगी', 'हम हैं राही प्यार के' आणि 'वेलकम बॅक'.

शेवटचा चित्रपट: मुश्ताक खान 2024 मधील गाजलेल्या 'स्त्री 2' (Stree 2) चित्रपटातही दिसले होते. तर 2025 मध्ये रिलीज झालेला 'उदयपुर फाइल्स: कन्हैया लाल टेलर मर्डर' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Daddy Cool Song : 15 वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर; ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने घातला धुमाकूळ!
15 वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर; ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने घातला धुमाकूळ!
Ramayana Box Office Collection : 'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
Ajay Purkar : 'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
Rohit Pawar On Ramayana: डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Embed widget