मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांची चौकशी आज सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भंसाली यांची चौकशी 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' या सिनेमांसंदर्भात केली जाणार आहे.

पोलिसांना माहिती मिळाली आहे की, संजय लीला भंसाली हे सुशांत सिंह राजपूतला 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' या चित्रपटांसाठी कास्ट करु इच्छित होते. मात्र एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत झालेल्या कॉन्ट्रॅक्टमुळं सुशांतला हे चित्रपट मिळू शकले नाहीत. त्यामुळं सुशांत आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये तणाव निर्माणा झाला होता. कारण सुशांत हे चित्रपट करु इच्छित होता. मात्र त्या प्रोडक्शन हाऊसनं त्याला कॉन्ट्रॅक्टमधून रिलिज केलं नाही.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर 'नेपोमीटर'च्या आधारे आलिया भट्ट हिचा 'सड़क 2' चित्रपट बॉयकॉट करण्याचं आवाहन

काही सूत्रांनी पोलिसांना सूचित केलं आहे की, प्रोडक्शन हाऊससोबतचं कॉन्ट्रॅक्ट तोडल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमधील काही मोठ्या लोकांनी  सुशांतला एकटं पाडण्याचे सतत प्रयत्न केले. त्यामुळं सुशांतला काम मिळणं कठिण झालं. मात्र सुशांतनं आपला अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर एम. एस. धोनीसारखा मोठा चित्रपट केला. मात्र त्यानंतरही त्याच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. सुशांतनं आपल्या काही जवळच्या मैत्रिणींना या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम न करण्याबाबत सांगितलं होतं.

पोस्टमॉर्टमनंतर सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्टही आला; मृत्यूबाबत 'हा' खुलासा

यामुळं पोलिस संजय लीला भंसाली यांची चौकशी करणार आहेत. या माहितीत किती खरं आणि किती खोटं आहे याबाबत त्यांची चौकशी होऊ शकते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी कसून पोलिस चौकशी केली जात आहे. आतापर्यंत या प्रकरणी 28 हून अधिक लोकांनी चौकशी झाली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; पोलिसांकडून यशराज फिल्म्सच्या दोन अधिकाऱ्यांची पाच तास चौकशी

सुशांत सिहं राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी याआधी  यशराज फिल्म्सच्या काही माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.