मुंबई : सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्ट मंगळवारी समोर आला. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सुशांत सिंहच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं संशयित रसायन किंवा विषारी पदार्थ आढळून आला नाही. पोस्टमॉर्टमनंतर व्हिसेरा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात विश्लेषणासाठी पाठवण्यात आलं. रिपोर्ट मंगळवारी संध्याकाळी आला आहे.


रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, 'मृत्यूच्या आधी कोणत्याही संघर्षाचे किंवा झटापटीचे संकेत मिळालेले नाहीत. तसेच सुशांतच्या नखांमध्येही काहीच आढळून आलेलं नाही.' सुशांत सिंहचा अंतिम शवविच्छेदन अहवाल गेल्या आठवड्यात आला होता. त्यामध्ये सांगितले होते की, सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून झाला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाच डॉक्टरांच्या टीमने तयार केला होता. याआधी आलेल्या प्रोव्हिजन पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचं सांगण्यात आलं होतं.


पाहा व्हिडीओ : अभिनेत्री संजना संघी जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल



मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या प्रकरणी त्याची सहकलाकार संजना सांघी ने आपला जबाब नोंदवला आहे. संजना सांघीने अभिनेता सुशांत सिंह सोबत 'दिल बेचेरा' या चित्रपटात काम केलं होतं. दुर्दैवाने हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. संजनाने आपला जबाब मंगळवारी सकाळी वांद्रे पोलीस स्थानकात नोंदवला. या केसमध्ये पोलिसांनी सुशांतचे कुटुंबीय आणि त्याच्या मित्र परिवारासहित 28 लोकांचे जबाब नोंदवले आहेत.


एका पोली अधिकाऱ्याने सांगितले की, 'सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच व्यावयासिक स्पर्धा किंवा एखादी व्यक्ती सुशांतच्या आत्महत्येसाठी कारण तर नाही ना, याचाही तपास केला जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी 28 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. ज्यामध्ये त्याचे कुटुंबीय, त्याची मैत्रिण रिया चक्रवर्ती, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा आणि यशराज फिल्म्सचे कास्टिंग दिग्दर्शक शानू शर्मा यांचाही समावेश आहे.'


महत्त्वाची बातमी : 


सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाला; समोर आलं मृत्यूचं खरं कारण


Sushant Singh Rajput Death | फिल्म इंडस्ट्रीतील तणावामुळे सुशांत लो फील करत होता, वडिलांचा जबाब


सुशांतच्या मित्राची भावुक पोस्ट; म्हणाला - 'त्याला त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच वाचवू शकत होती'

'मला सुशांतने यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते', रिया चक्रवर्तीचा पोलिसांना जबाब


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून 11 तास चौकशी


'सुशांतने मला सांगितले, तो ठीक नाही' : मुकेश छाबरा