तिरुवनंतपुरम : देशात सर्वात आधी कोरोना संक्रमित रुग्ण केरळमध्ये आढळला होता. मात्र, केरळने चांगल्या प्रकारे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यळ मिळवले आहे. महाराष्ट्राने देखील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केरळ प्रशासनाचं मार्गदर्शन घेतलं आहे. आता केरळच्या तिरुवनंतपुरम ट्रिपल लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. काय असतो हा ट्रिपल लॉकडाऊन? जाणून घेऊया.


तिरुवनंतपुरममध्ये रविवारी नवीन 27 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्गा रोखण्यासाठी तिरुवनंतपुरम प्रशासनाने ट्रिपल लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे ट्रिपल लॉकडाऊन?

  • ट्रिपल लॉकडाऊन ही कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीची योजना आहे.

  • ट्रिपल लॉकडाऊनमध्ये तीन टप्पे असतात.

  • या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात नियोजित क्षेत्रात लॉकडाऊन करणे, सध्या तिरुअनंतपुरम महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन करण्यात आलय. या क्षेत्रात कोणालाही येण्या-जाण्यासाठी बंदी असते.

  • दुसऱ्या टप्प्यात क्लस्टर ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत, ते लॉक केलं जातात. जेथून कोरोना संसर्ग पसरण्याचा जास्त धोका असतो.

  • तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीचं घर लॉक केलं जातं. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कात आलेले सर्वजण घरातचं राहतील याची काळजी या लॉकडाऊनमध्ये घेतली जाते. जेणेकरुन संसर्ग पसरणाऱ्याला आळा बसेल.


Jalneti | 'जलनेती' वापरुन कोरोना प्रादुर्भाव टाळता येतो; पुण्यातील डॉक्टरांचा दावा

उद्यापासून (6 जुलै) तिरुवनंतपुरममध्ये ट्रिपल लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. यामध्ये केवळ रुग्णालय आणि मेडिकल दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहे. सर्व सरकारी कार्यालयेही या काळात बंद ठेवण्यात येत आहे. जीवनावश्यक गोष्टी या ठिकाणी घरपोच करण्यात येणार आहे.

भारत तिसऱ्या स्थानावर
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत आता भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार भारताने रशिला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ही झेप भारतीयांची चिंता वाढवणारी आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत, मात्र तितकसं यश अद्याप मिळालेलं दिसत नाही.

Anti Covid Shop Pune | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या वस्तू एकाच दुकानात,पुण्यात खास अॅंटी कोविड शॉप