मुंबई : सुशांत सिहं राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी शुक्रवारी यशराज फिल्म्सच्या दोन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशराज फिल्म्सचे माजी उपाध्यक्ष आशिष सिंह यांची चौकशी केली आणि यशराज फिल्म्ससोबत आधी काम करणाऱ्या आशिष पाटील यांचीही चौकशी केली. 2012मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत करण्याक आलेल्या यशराज फिल्म्सच्या कॉन्ट्रॅक्टवर या दोघांच्याही सह्या होत्या.


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष सिंह यांची जवळपास पाच तास चौकशी करण्यात आली आणि यादरम्यान, त्यांना कॉन्ट्रॅक्टबाबत सविस्तर माहिती विचारण्यात आली. त्यांनी 2015पर्यंत सुशांत यशराज फिल्म्ससोबत असल्याचंही सांगितलं आणि आपला जबाब नोंदवला. वांद्रे पोलिसांनी आशिष पाटील यांनाही सुशांतसोबतच्या कराराबाबत प्रश्न विचारले. तसेच सुशांतचं काम आणि यशराज फिल्म्समधून बाहेर पडण्याबाबत चौकशी केली.


एका न्यूज पोर्टलने आशिष सिंह यांनी सुशांत यशराज फिल्म्समधून बाहेर पडण्याचं कारण विचारलं होतं, त्यावेळी त्यांनी मी यासंदर्भात काहीही सांगू शकत नाही, सगळी कारणं करारामध्ये दिलेली आहेत. त्यांनी सांगितलं, परस्पर संमतीने यशराज फिल्म्समधून बाहेर पडल्यानंतरही ते सुशांतच्या संपर्कात होते. त्यांनी सांगितलं की, 'आम्ही दोन चित्रपट एकत्र केले. काही प्रोजेक्ट, काही चित्रपट करणं शक्य झालं नाही. सुशांतने पाच वर्षांपूर्वीच यशराज फिल्म्स सोडलं होतं. तरिही आम्ही त्याच्या संपर्कात होतो. काहीच समस्या नव्हत्या. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.'


पाहा व्हिडीओ : सुशांतनं यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले : रिया चक्रवर्ती



दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना सुशांत सिंह राजपूतच्या व्यावसायिक वैमनस्याच्या अँगलचीही चौकशी करण्यास सांगितले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या प्रोडक्शन कंपनींपैकी एक असलेल्या यशराज फिल्म्सला पत्र लिहिलं आहे, ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत करण्यात आलेल्या सर्व करारांच्या कॉपी मागवल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :


सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाला; समोर आलं मृत्यूचं खरं कारण

सुशांतच्या मित्राची भावुक पोस्ट; म्हणाला - 'त्याला त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच वाचवू शकत होती'


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी व्यावसायिक वैमनस्याच्या अँगलचीही चौकशी करणार : अनिल देशमुख