एक्स्प्लोर

मुलुंड मेट्रो दुर्घटनेवरुन सेलिब्रिटींचा संताप; दिया मिर्झा अन् राहुल वैद्यनं सरकारवर ओढले ताशेरे, पोस्ट व्हायरल

Celebrities React After Fatal Mumbai Metro: मुलुंड पश्चिम येथे मेट्रो लाईन 4 च्या बांधकामादरम्यान काँक्रीट स्लॅब कोसळला. सेलिब्रिटींनी या प्रकरणावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Celebrities react to Mumbai metro bridge collapse: 14  फेब्रुवारी 2026 रोजी शनिवारी मुलुंड पश्चिम येथे मोठी दुर्घटना घडली.  मेट्रो लाइन 4 च्या बांधकामादरम्यान काँक्रीटचा भाग कोसळला.  मेट्रो पुलाचा  स्लॅब थेट चार चाकी वाहन आणि रिक्षावर पडला. यामुळे या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.  या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर,  इतर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबाला  5 लाख रूपयांची भरपाई जाहीर केली आहे. या प्रकरणानंतर सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनीही रोष व्यक्त केला.  

स्टँड - अप कॉमेडियन आणि चित्रपट निर्माते वरूण ग्रोव्हर याने मुंबईला सर्वात भ्रष्ट शहर म्हटले आहे. तर, दिया मिर्झा आणि राहुल वैद्यसारख्या कलाकारांनी आवाज उठवला आहे.  वरूण ग्रोव्हरने आपला संताप व्यक्त करत एक्सवर पोस्ट केले, 'मुंबई हे भारतातील सर्वात भ्रष्ट शहर आहे. भारताच्या  व्यावसायिक  राजधानीत सर्वात वाईट रस्ते आहेत. गेल्या दोन वर्षांत मी जवळजवळ प्रत्येक गावातील रस्ते पाहिले आहेत. ते मुंबईच्या रस्त्यांपेक्षा चांगले आहेत.  हे खराब शहरी नियोजन आहे', असं म्हणत त्याने संताप तसेच नाराजी व्यक्त केली.

मुंबई मेट्रोच्या ढिसाळ कामाबाबत अभिनेत्री दिया मिर्झा आणि गायक राहुल वैद्य याने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दिया मिर्झाने एक्स पोस्टवर, शहरी विकासाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  'तुम्ही पायाभूत सुविधांच्या कोणत्या संकल्पनेचे समर्थन करता? जी सामान्य नागरिकांचे जीवन गुदमरवते, त्यांच्या आरोग्याला आणि जीवनाला धोका निर्माण करते? की जी सामान्यांच्या सुरक्षिततेची, जीवनमानाची  आणि कल्याणाची खरोखर काळजी घेते?' काहींनी सुरक्षिततेबद्दलच्या तिच्या चिंतेचे समर्थन केले. 

राहुल वैद्य यानेही इन्स्टाग्रामवर आपली चिंता व्यक्त केली आहे. पूल कोसळल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्याने लिहिले की, 'मी जेव्हा जेव्हा मेट्रो पुलाखालून जातो, तेव्हा मला नेहमीच भीती वाटते.  मला नेहमीच याची भीती वाटते', असं त्याने म्हटलं आहे. राहुल वैद्यची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget