एक्स्प्लोर

ST Bus Brand Ambassador: 'लालपरी'ला मिळणार नवं ग्लॅमर! रितेश- जिनिलिया STचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर, याआधी कोणते कलाकार होते?

ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांपर्यंत एसटीची सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय.

ST Bus Brand Ambassador: महाराष्ट्राची ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला आता नव्या चेहऱ्यांची साथ मिळणार आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)  आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची एसटी महामंडळाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसिटर म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आणि एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक व आकर्षक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. (MSRTC Brand Ambassador)

पाच वर्षांसाठी करार, लवकरच अधिकृत घोषणा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक येत्या दोन दिवसांत रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबत अधिकृत करार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा करार पाच वर्षांसाठी असणार असून, या काळात दोघेही एसटीच्या विविध जाहिराती, प्रचार मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतील. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांपर्यंत एसटीची सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय.

याआधीही मराठी कलाकारांची साथ

एसटी महामंडळासाठी प्रसिद्ध कलाकारांना ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून निवडण्यात आलेलं. याआधी मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या माध्यमातून एसटीला एक वेगळी ओळख मिळाली होती. आता रितेश आणि जिनिलियाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत एसटी महामंडळ नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावरही या निर्णयाची चर्चा रंगली असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या काळात या जोडीला ‘लालपरी’च्या प्रचारासाठी विविध कार्यक्रम आणि मोहिमांमध्ये पाहायला मिळणार आहे.

रितेश-जिनेलियाच्या धाकट्या लेकाचं इंडस्ट्रीत दणक्यात पदार्पण

'राजा शिवाजी'च्या निमित्तानं रितेश आणि जिनेलियाच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. या सिनेमात रितेश-जिनेलिया स्वतः झळकणार आहेतच, पण त्यासोबतच त्यांचा धाकटा लेकही सिनेमात झळकणार आहे.  'राजा शिवाजी' हा सिनेमा रितेश देशमुख आणि जिनेलिया यांच्यासाठी अनेक कारणांमुळे खास ठरला आहे. या सिनेमात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शनही स्वतः रितेश देशमुख यानंच केलंय. तर, जिनेलिया या सिनेमात महाराणी सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. पण, हा सिनेमा आणखी एका कारणानं रितेश-जिनेलियासाठी खास ठरलाय. या सिनेमातून रितेशचा धाकटा मुलगा राहिल देशमुख (Rahyl Deshmukh) हादेखील सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. 

महत्त्वाच्या बातम्या

Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Embed widget