Mrunal Thakur : छोट्या पडद्यावरील मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या तिच्या जर्सी या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मृणालनं 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या 'मुझसे कुछ कहते हैं.. ये खामोशियां' या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर तिला 'कुमकुम भाग्य'  या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. एका मुलाखतीमध्ये मृणालनं तिच्या ऑडिशनबाबत सांगितले. 


तिनं ऑडिशनबबत एका मुलाखतमीमध्ये सांगितलं, 'मला लोकांचे मनोरंजन करायचे आहे. मी खूप भाग्यवान आहे की मला वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.  मी कष्ट करू शकते. मी खूप संघर्ष केला आहे. मी निर्लज्जपणे ऑडिशनसाठी जात होते. जोपर्यंत माझा टेक घेतला जात नव्हता  तोपर्यंत मी तिथेच थांबत होते. मी खूप हट्टी होतो आणि अजूनही आहे."






लव सनिया या चित्रपटामधून मृणालनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं सुपर 30, बाटला हाऊस आणि धमाका या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली.  लवकरच तिचा जर्सी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील मृणाल आणि अभिनेता शाहिद कपूर यांची केमिस्ट्री पाहण्यााठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


हेही वाचा :