Movies Releasing In December 2022 : यावेळी 2022 हे वर्ष चित्रपटप्रेमींसाठी काहीसे निराशाजनक ठरले आहे. बॉयकॉटच्या (Boycott) ट्रेंडमध्ये काही चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. मात्र, वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात (December 2022)  प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घडणार आहे. डिसेंबरचा दुसरा आठवडा हा अनेक चित्रपटांनी भरलेला असणार आहे. क्राइम, थ्रिलर, कॉमेडीपासून सस्पेन्सपर्यंत सर्व काही या आठवड्यात प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला 5 ते 11 डिसेंबर दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संपूर्ण यादी सांगणार आहोत. या डिसेंबर महिन्यात जवळपास 32 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 


सहा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार 


या आठवड्यात सहा हिंदी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. 9 डिसेंबरला बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि विशाल जेठवा यांचा 'सलाम वेंकी' (Salaam Venky) प्रदर्शित होणार आहे. यासबरोबरच संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा 'वध' (Vadh) हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. जॅकी श्रॉफचा 'लाइफ इज गुड' (Life Is Good), तुषार कपूरचा 'मारीच' (Maarich) आणि कन्नड दिग्दर्शक ऋषिका शर्माचा 'पॅन इंडिया' (Pan India) चित्रपट 'विजयानंद' (Vijayanand) देखील 9 डिसेंबरला हिंदीत प्रदर्शित होणार आहे. 


'हे' तेलुगू चित्रपट होणार प्रदर्शित 


काही तेलुगू चित्रपटदेखील डिसेंबरच्या आठवड्यात 9 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहेत. तेलुगू भाषेतील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार आहेत. 'चेपलानी उडी', 'माँ इष्टम', 'डीआर 56', 'प्रेमदेशम', गुरतुंडा सीतकलम', 'पंचंतरम', 'आय लव्ह यू इडियट', 'नमस्ते सेठ जी' रिलीजसाठी सज्ज आहेत. हे सर्व चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहेत. 


मल्याळम आणि कन्नड सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, मल्याळम भाषेतील 'DR 56' चित्रपट या आठवड्यात 9 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर 'विजयानंद' हा चित्रपट मल्याळम भाषेसह हिंदी, कन्नड, तामिळ, आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. कन्नडमध्ये 'बंद रवी', 'पंखुरी', 'होसा दिनचारी' हे तीनच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सर्व चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतील. 


महत्त्वाच्या बातम्या : 


December Release : वर्षाचा शेवट होणार मनोरंजनात्मक! 'गोविंदा नाम मेरा' ते 'सर्कस'; डिसेंबरमध्ये मनोरंजनाची मोठी मेजवानी