IPL Mini Auction 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) आता काही महिन्यांवर आली आहे, त्यापूर्वी आयपीएलचा मिनी ऑक्शन या महिन्यातच पार पडू शकतो. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आर अश्विनने (R Ashwin) इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या लिलावात स्टोक्सवर एक-दोन नाही तर पाच संघाची नजर असेल, त्याला स्वत:सोबत जोडून घेण्यासाठी सर्वजण इच्छूक असतील असं आर. अश्विन म्हणाला.


आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार अशी माहिती समोर आली होती. पण अनेक फ्रँचायझींनी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तारखेत बदल करण्याची विनंती केली होती. मात्र, बीसीसीआय आयपीलच्या मिनी ऑक्शनमध्ये कोणताही बदल केलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 


हे संघ असणार इच्छूक


स्टोक्सला आपल्या संघात समावेश करण्यासाठी पाच फ्रँचायझी इच्छूक असू शकतात. यामध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज, शिखर धवनचा पंजाब किंग्ज आणि रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स. या सर्व फ्रँचायझी बेनला आपल्या संघात सामावून घेण्याचा संपूर्ण प्रयत्न करतील. मात्र, या सगळ्यात लखनौचा संघच त्याला विकत घेण्याची दाट शक्यता आहे.


या खेळाडूंवर लागणार मोठी बोली


बेन स्टोक्ससह सॅम करन, केन विल्यमसन, अॅलेक्स हेल्स, आदिल रशीद, कॅमेरून ग्रीन हे दिग्गज देखील आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये सहभागी होतील. त्यामुळे यावेळचा मिनी ऑक्शन खूपच रंजक असणार आहे. कोणता संघ कोणत्या खेळाडूवर बोली लावतो? हे पाहावं लागेल. विशेष म्हणजे, मिनी लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी एकूण 163 खेळाडूंना रिटेन करण्यात आलंय. तर, एकूण 85 खेळाडूंना रिलीज करण्यात आलं.


कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?


1. सनरायजर्स हैदराबाद


सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनसह एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. एकूण 12 खेळाडूंना त्यांनी रिलीज केलं आहे.


2. पंजाब किंग्स


दुसरीकडे पंजाब संघाने एकूण 10 संघाला रिलीज केलं आहे. यानंतर संघाकडे एकूण 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहेत. आता टीमकडे एकूण 7.05 कोटी पर्समध्ये शिल्लक आहेत. हा पैसा त्यांना मिनी लिलावात वापरता येणार आहे.


3. लखनौ सुपरजायंट्स


 मागील वर्षी उपांत्य फेरीत पोहोचलेल्या लखनौ सुपर जायंट्सने यावेळी काही खेळाडूंना सोडले असून त्यांची एकूण पर्स व्हॅल्यू 23.35 कोटी इतकी झाली आहे. संघात एकूण 4 विदेशी खेळाडूंचे स्थान शिल्लक आहे.


4. मुंबई इंडियन्स


आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबईने अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबईकडे 20.55 कोटी रुपये शिल्लक असणार आहेत.


5. चेन्नई सुपर किंग्स


चेन्नई संघाने ख्रिस जॉर्डन आणि अॅडम मिल्नेसारखे खेळाडू सोडले आहेत. आता टीमकडे एकूण 20.45 कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे. त्याच वेळी, संघाकडे एकूण 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.


6. दिल्ली कॅपिटल्स


दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकुरला केकेआरला ट्रेड केलं आहे. ज्यानंतर त्यांच्याकडे 19.45 कोटी इतके रुपये शिल्लक आहेत. तर 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.


7. गुजरात टायटन्स


आयपीएल 2022 जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सने लॉकी फर्ग्यूसन आणि रहमनुल्ला गुरबाज यांना ट्रेड केलं आहे. ज्यानंतर टीमकडे एकूण 19.25 कोटी रुपए शिल्लक आहेत. तर 3 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.


8. राजस्थान रॉयल्स


राजस्थान रॉयल्स संघाकडे खेळाडूंना रिलीज केल्यावर 13.20 कोटी इतकी पर्स वॅल्यू असून 4 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहे.


9. रॉयल चँलेंजर्स बंगळुरु


रॉयल चँलेंजर्स बंगळुरुकडे 8.75 कोटी रुपये शिल्लक असून 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहे.


10. कोलकाता नाईट रायडर्स


केकेआरने लॉकी फोर्ग्युसन, शार्दुल ठाकूर आणि रहमानउल्ला गुरबाज यांचा ट्रेडद्वारे संघात समावेश केला आहे. यानंतर, संघाकडे 7.05 कोटी रुपये शिल्लक आहेत, जे सर्व संघांमध्ये सर्वात कमी आहे. त्याचबरोबर संघात 3 विदेशी खेळाडूंचे स्लॉटही उपलब्ध आहेत. 


हे देखील वाचा-