Karan Johar : बॉलिवूड चित्रपट सध्या ‘बॉयकॉट’ ट्रेंडमुळे (Boycott Trend) हैराण झाले आहेत. या बॉयकॉट ट्रेंडमुळे एकापाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहेत. या ट्रेंडचा चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), आमिर खान (Aamir Khan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांसारख्या बड्या कलाकारांचे चित्रपटही सपाटून आपटले आहेत. या बॉयकॉट ट्रेंडवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) देखील या ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाच्या एका प्रमोशन इव्हेंट दरम्यान त्याने यावर आपलं मत मांडलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहरने फिल्म इंडस्ट्रीकडे 'बॉलिवूड' किंवा 'टॉलिवूड' म्हणून पाहिले जाऊ नये, असे म्हटले आहे. करण जोहर म्हणाला, चित्रपटांमध्ये ‘बॉलिवूड’ किंवा ‘टॉलिवूड’ असा फरक न करता, सगळ्यांना ‘भारतीय चित्रपट’ असे म्हटले गेले पाहिजे.
काय म्हणाला करण जोहर?
नुकताच करण जोहर टीम ‘ब्रह्मास्त्र’सोबत प्रमोशनसाठी हैदराबादला पोहोचला होता. यादरम्यान करणने बॉलिवूडच्या बॉयकॉट ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘चित्रपट लोकांना आवडावा यासाठी आम्ही आमचे सगळे प्रयत्न करत आहोत. एसएस राजामौली सर म्हणाले, त्याप्रमाणे हा भारतीय सिनेमा आहे. याला दुसरी कोणतीही नावे देता कामा नये. पण, आपणच त्याला बॉलिवूड, टॉलिवूड अशी नावे देत राहतो. आपण या भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भाग आहोत, याचा अभिमान आहे. आता प्रत्येक चित्रपट भारतीय चित्रपट म्हणून ओळखला गेला पाहिजे.’
चित्रपट पाहण्याचे आवाहन
'ब्रह्मास्त्र' सारखा अनोखा चित्रपट बनवून भारतीय चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल राजामौली यांनी दिग्दर्शक अयान मुखर्जीचे कौतुक केले आणि प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन केले. यावेळी राजामौली यांनी लोकांना साऊथ आणि हिंदी चित्रपटांमध्ये भेदभाव न करण्याचे आवाहन केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिमानाचा एक क्षण म्हणून ‘ब्रह्मास्त्र’सारखा वेगळ्या प्रकारचा चित्रपट पाहावा, असे ते म्हणाले.
‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने दिग्दर्शन केले आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं केली आहे. तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच, आलिया आणि रणबीरची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहे. या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: