Amar Singh Chamkila Review : 1970 च्या दशकातील पंजाबमधील एक अत्यंत खालच्या जातीतील लोकगीते गाणारा तरुण. त्याला गायनाची आवड असते. गीतेही तो स्वतःच लिहित असतो आणि त्यांना संगीतही देत असतो. अनेक प्रस्थापित गायकांशी स्पर्धा करीत हा तरुण फार पुढे निघून जातो. त्याच्या कॅसेट्सची विक्री कोट्यवधींच्या घरात असते. थोडी अश्लील अशी गाणी तो सादर करीत असतो आणि त्याची ही गाणी लोकांनी डोक्यावर घेतलेली असतात.


आपल्याकडे ज्याप्रमाणे तमाशात थोडाफार उद्देपित करणयाचा प्रकार असतो किंवा भोजपुरीमध्ये अश्लील गाणी असतात त्यातलाच हा प्रकार. मात्र हा गायक परदेशातही प्रचंड लोकप्रियता मिळवतो. त्याला पंजाबचा एल्विस प्रेस्ली म्हणून ओळखले जाऊ लागते. पत्नीबरोबरची त्याची जोडी दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर कायम असते, आणि अशातच एक दिवस एका कार्यक्रमात जात असताना या जोडीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, त्यावेळी हा तरुण फक्त 27 वर्षांचा असतो. पोलीस हत्येचा तपास सुरु करतात आणि नंतर तपास बंद करून टाकतात. त्या गायकाची हत्या कोणी आणि का केली हे अजूनही गुपित आहे. एखाद्या रहस्यमय थरारक चित्रपटासाठी अत्यंत आकर्षक असा विषय.


एखाद्या व्यक्तीची रुपेरी पडद्यावर बायोग्राफी आणायची असेल तर ती फार काळजीपूर्वक आणि लघुपट वाटणार नाही अशा पद्धतीने आणावी लागते. तसेच त्यात नाट्यही भरावे लागते तर ती प्रक्षकांना आवडते. आजवर अनके बायोग्राफ़ी रुपेरी पडद्यावर आल्या त्यापैकी काही यशस्वी झाल्या तर काही अयशस्वी. गेल्या महिन्यात रणदीप हुड्डा सावरकरांची जीवनगाथा स्वातंत्र्यवीर सावरकर नावाने घेऊन आला होता जी चांगली जमली होती. आणि आता इम्तियाज अलीने बायोग्राफीमध्ये एक नवीन प्रयोग केला असून एक अत्यंत उत्कृष्ट असा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केला आहे. या चित्रपटाचे नाव आहे अमर सिंह चमकीला. 


चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा खऱ्या घटनांवर आधारित चित्रपट आहे असे नमूद करतानाच या चित्रपटातील घटना, व्यक्ती, प्रसंग काल्पनिक असून त्यात साम्य आढळळ्यास तो योगायोगा समजावा. खरे तर इम्तियाज अलीला हे अधोरेखित करण्याची गरज नव्हती असे वाटते परंतु जेव्हा आपण चित्रपट पाहायला सुरुवात करतो तेव्हा त्याने हे का लिहिले असेल याची जाणीव होते. इम्तियाज अलीने चमकीलाचे जीवन पडद्यावर मांडलेले नाही तर त्याची कथा घेऊन त्याचा अभ्यास करून त्याच्या पाठीमागची मानसिकता लक्षात घेऊन त्याने कथेची रचना केली आहे आणि ती पडद्यावर उत्कृष्ट एडिटिंगच्या आणि नव्या प्रकाराने मांडली आहे.


एका रात्रीचा हा चित्रपट आहें. चित्रपट सुरुच होतो अमर सिंह चमकीला आणि त्याची पत्नी अमरजोत यांच्यावरील गोळीबाराने. गोळीबारात दोघांचा मृत्यू होतो. या दोघांचे मृतदेह एका ट्रॉलीवर ठेऊन फिल्लौरला घेऊन जातात. तेथेच पोलीसही येतात आणि ज्यांनी मृतदेह आणलेले असतात ते चमकीलाची कथा पोलीस अधिकाऱ्याला सांगतात आणि आपल्यासमोरही चमकीलाचे आयुष्य उलगडत जाते. एका दलित गरीब घरात जन्मलेल्या अमर सिंहचे खरे नाव असते धनीराम. घर चालवण्यासाठी लहानपणापासूनच त्याला विविध प्रकारची कामे करावी लागतात. मात्र तो आपल्या गायनाची आवड जोपासत असतो. परदेशातही त्याची प्रचंड क्रेझ



मी चित्रपटाला देतो 4 स्टार्स