एक्स्प्लोर

Michael Movie Worldwide Collection, Jaafar Jackson: 'धुरंधर 2' विसरा, फक्त 5 दिवसांतच 2000 कोटी कमावणारी जगातील सर्वात मोठी बायोपिक पाहा; काकाचं पात्र साकारून पुतण्यानं केलीय कमाल

Michael Movie Worldwide Collection, Jaafar Jackson: जगातील पॉप संगीताचा बादशाह अशी ओळख असलेल्या मायकल जॅक्सन (Michael Jackson) याच्या आयुष्यावर आधारित असलेल्या बायोपिकनं जगभरात धुमाकूळ घातला आहे.

Michael Movie Worldwide Collection, Jaafar Jackson: फक्त आणि फक्त 5 दिवसांत 2 हजार कोटींचा टप्पा ओलांडून नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमानं बॉक्स ऑफिस (Box Office Collection) पुरतं हादरवून सोडलं आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिस (Box Office) स्वतःच्या ताब्यात ठेवलेल्या आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' (Dhurandhar The Revenge) सिनेमानं रिलीज झाल्यापासून दीड महिन्यांच्या कालावधीत 1 हजार 800 कोटींची कमाई केलेली. 'धुरंधर 2'च्या अफाट कमाईपुढे इतर कोणत्याही सिनेमाचा निभाव लागणार नाही, असंच दिसत होतं. पण, नुकत्याच आलेल्या या बायोपिकनं 'धुरंधर 2'ला पछाडलं असून धमाकेदार कमाई करुन बॉक्स ऑफिसचा ताबा स्वतःकडे घेतला आहे. जगातील सर्वात मोठी बायोपिक असलेल्या या सिनेमावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या सिनेमात आपल्या काकाची भूमिका पुतण्यानं साकारली आहे. 

आम्ही ज्या जगातल्या सर्वात मोठ्या बायोपिकबाबत बोलत आहोत, तिचं नाव आहे, 'Michael'. जगातील पॉप संगीताचा बादशाह अशी ओळख असलेल्या मायकल जॅक्सन (Michael Jackson) याच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात मायकल जॅक्सनच्या लहानपणापासून ते अगदी तो पॉपस्टार होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यता आलाय. त्यांच्या संगीत कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे, वादग्रस्त प्रसंग आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार यांचा सविस्तर आढावा या सिनेमातून घेण्यात आला आहे.

पुतण्यानं साकारलंय काकाचं पात्र (Jaafar Jackson Play Michael Jackson Role)

'Michael' सिनेमात मायकल जॅक्सनचं पात्र त्याच्याच पुतण्यानं साकारलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मायकल जॅक्सनचा पुतण्या Jaafar Jackson यानं आपल्या काकाची भूमिका एवढ्या प्रभावीपणे साकारली आहे की, सर्वांना त्याच्याच मायकल दिसतोय. ज्यामुळे या प्रोजेक्टनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. या सिनेमाचं दिग्दर्शन  Antoine Fuqua यांनी केलं असून निर्मिती Graham King यांनी केली आहे.

चित्रपट समीक्षकांकडून 'Michael' सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असूनही, हा बायोपिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. ही बाब चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवरून स्पष्टपणे दिसून येते. या चित्रपटानं केवळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येच मोठी कमाई केली नाही, तर भारतीय चित्रपटगृहांमध्येही तो सध्या धुमाकूळ घालतोय.

'ओपनहायमर' सिनेमाला टाकलं मागे (Michael vs Oppenheimer)

ख्रिस्तोफर नोलन याच्या 'ओपनहायमर' सिनेमावर मायकल जॅक्सनचा बायोपिक 'माइकल' भारी पडलाय. या फिल्मनं ब्लॉकबस्टर बायोपिक 'ओपनहायमर' आणि 'बोहीमियन रॅप्सडी' (Bohemian Rhapsody) चा रेकॉर्ड मोडलाय. 

जगभरात 'मायकल' सिनेमाचीच चर्चा (Michael Box Office Collection)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये, ज्यामध्ये युकेचाही समावेश आहे, 22 एप्रिल रोजी आणि भारतीय चित्रपटगृहांमध्ये 24 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या 'मायकल' (Michael) सिनेमानं, प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात (Opening Weekend) सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम रचत इतिहास घडवला आहे. 'द गार्डियन' (The Guardian) च्या माहितीनुसार, या सिनेमानं जगभरात 217 दशलक्ष डॉलर्सची (2,000 कोटींहून अधिक) कमाई केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Youth Film Trending On Netflix: 'धुरंधर 2' नाही, 'ही' फिल्म 2026 ची 'मोस्ट प्रॉफिटेबल मूव्ही'; 2 तास 20 मिनिटं पापणीही पडू देणार नाही, IMDb रेटिंगही धमाकेदार

महत्त्वाच्या बातम्या

Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget