Michael Jackson : पॉप जगताचा बादशाह मायकल जॅक्सन (Michael Jackson) याने आजच्याच दिवशी अर्थात 25 जून 2009 रोजी या जगाचा निरोप घेतला होता. आपल्या गाण्यांनी आणि आपल्या नृत्यशैलीने अवघ्या जगाला भुरळ घालणारा मायकल जॅक्सन सगळ्यांचाच लाडका होता. मायकल जॅक्सनचा जन्म 29 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील गॅरी या शहरात झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेला मायकल 1964मध्ये आपल्या भावाच्या पॉप ग्रुपमध्ये सामील झाला. 1982मध्ये त्याचा 'थ्रिलर' अल्बम रिलीज झाल्यावर त्याला जगभरात ओळख मिळाली.


मायकल जॅक्सनने वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्याला 150 वर्ष जगायचं होतं. यासाठी त्यांनी 12 डॉक्टरांची टीम ठेवली होती, जी नेहमी त्याच्यासोबत सावली सारखी असायची. ही टीम त्याची नियमित तपासणी करायची. मायकल जॅक्सनचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचेही बोलले जाते. मायकलने सुंदर दिसण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या, त्या शस्त्रक्रिया देखील त्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याचे बोलले जाते.


गाणं चुकलं की मिळायचा मार!


बँडमध्ये गाताना त्याच्याकडून कोणतीही चूक झाली की, त्याचे वडील त्याला बेल्टने मारायचे. या सगळ्याचा मायकलवर खूप वाईट परिणाम झाला होता. इतकी प्रसिद्धी मिळवत असूनही मायकल त्याच्या वडिलांची मारहाण सहन करत होता. मायकल जॅक्सनचा अल्बम ‘थ्रिलर’ हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा अल्बम आहे. या अल्बमच्या 100 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. तसेच, मायकेलच्या नावावर 39 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद आहे.


2019 मध्ये, तो फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणार्‍या कलाकारांमध्ये प्रथम क्रमांकावर होता. मायकल जॅक्सनचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या मृत्यूची बातमी पसरताच ट्विटर साईट देखील क्रॅश झाली होती. त्याचा अंत्यसंस्कार हा जगातील दुसरा सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ ठरला आहे. हा व्हिडीओ तब्बल 2.4 अब्ज लोकांनी पाहिला, ही संख्या जगातील लोकसंख्येच्या निम्मी आहे.


संबंधित बातम्या


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Judaa Hoke Bhi Trailer : भयपंटाचा बादशाह विक्रम भट्ट पुन्हा एकदा सज्ज; 'जुदा होके भी'चा ट्रेलर रिलीज


Sarsenapati Hambirrao : सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाचव्या आठवड्यातही उसळतेय गर्दी; प्रविण तरडेंनी केली खास पोस्ट