Judaa Hoke Bhi Trailer : भयपंटाचा बादशाह अशी बॉलिवूडमध्ये विक्रम भट्ट (Vikram Bhatt) यांची ओळख आहे. राजसारख्या अनेक दर्जेदार भयपटांच्या दिग्दर्शनाची धुरा विक्रम भट्ट यांनी सांभाळली आहे. नुकताच विक्रमचा आगामी 'जुदा होके भी' (Judaa Hoke Bhi) या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलरने प्रेक्षकांना चांगलाच घाबरवलं आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. 


15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित


'जुदा होके भी' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अनेक भितीदायक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. सिनेमाचा रहस्यमय ट्रेलर प्रेक्षकांना सिनेमा बघायला भाग पाडणारा आहे. हा सिनेमा 15 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अक्षय ओवरॉय  (Akshay Oberoi) मुख्य भूमिकेत आहे. तर अॅन्द्रिता रेदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 






विक्रम भट्टचा 'राज' गाजला बॉक्स ऑफिसवर  


बॉलिवूड विश्वात थ्रिलर आणि रहस्यमय सिनेमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे दिग्दर्शक म्हणजे विक्रम भट्ट. ‘राज’ हा 2002 चा विक्रम भट्ट दिग्दर्शित आणि मुकेश भट्ट निर्मित हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात बिपाशा बसू आणि डिनो मोरिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपता ही जोडी त्यांचे अयशस्वी लग्न वाचवण्यासाठी उटीला जाते. तिथे त्यांना एका अनैसर्गिक शक्तीचा सामना करावा लागतो. मग, पत्नी संजना आपल्या पतीला भुताटकीच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी लढते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता.


संबंधित बातम्या


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Lucky Ali : 'आय लव्ह उद्धव...विषय संपला'...राजकीय घडामोडींवर लकी अली यांची पोस्ट चर्चेत