TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


'ये कहानी है शमशेरा की'; 'शमशेरा' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज


शमशेरा (Shamshera) या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि  संजय दत्त (Sanjay Dutt) अशी तगडी स्टार कास्ट असणारा 'शमशेरा' (Shamshera) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 21 जून रोजी या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज झाला आहे. आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. 


'नेटफ्लिक्स' तोट्यात... 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं


Netflix Lays Off 300 Employees : लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) चक्क 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनीला लागलेली घरघर याला कारणीभूत आहे. नेटफ्लिक्स कंपनीला झालेल्या तोट्यामुळे कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना कामारून कमी केलं आहे. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने गुरुवारी यासंदर्भात माहिती देत सांगितलं आहे की, 'गेला काही काळ कंपनीला नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे, उत्पन्नात घट झाली आहे. आम्ही व्यवसायात लक्षणीय गुंतवणूक करत आहोत. परिणामी आगामी काळात खर्च वाढत जातील. यामुळे कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे.'


किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोणा’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खाननेही केलं कौतुक!


साऊथ स्टार किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeep) बहुप्रतीक्षित चित्रपट 'विक्रांत रोणा' (Vikrant Rona) 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. सुदीप त्याच्या चित्रपटामुळे आधीच चर्चेत आला आहे. त्याच्या चित्रपटाचे पोस्टरच खूपच जबरदस्त होते. या पोस्टर रिलीजपासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वादळी होती. नुकताच या चित्रपटाचा हिंदीतील ट्रेलर रिलीज झाला आहे. बॉलिवूड स्टार सलमान खानने या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर शेअर केला आहे. एका कार्यक्रमात सुदीपने ‘भाईजान’ सलमान खानबद्दल बरेच कौतुक केले होते. यानंतर आता सलमान खानने त्याच्या इंस्टावर चित्रपटाचा हिंदी ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करत सुदीपचे खूप कौतुक केले आहे.


'वुमन लाईक हर'; डिस्कव्हरीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार चार महिलांचा रोमांचक प्रवास


डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. लवकरच 'वुमन लाइक हर' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना चार महिलांचा रोमांचक प्रवास जाणून घेता येणार आहे. 


 सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाचव्या आठवड्यातही उसळतेय गर्दी


'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आता या सिनेमाने पाचव्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. 


'आय लव्ह उद्धव...विषय संपला'...राजकीय घडामोडींवर लकी अली यांची पोस्ट चर्चेत


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच शिंदे आणि ठाकरे गटाबद्दल (Uddhav Thackeray) आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी गायक लकी अलीची (Lucky Ali) पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायक लकी अली यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले आहे, आय लव्ह उद्धव, मी उद्धव ठाकरेंच्या राज्यकारभाराचा आदर करत आहे. विषय संपला".


'भूल भुलैया 2'च्या यशाने भूषण कुमार भारावला; कार्तिक आर्यनला दिली महागड्या कारची भेट


बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या यशाने निर्माता भूषण कुमार (Bhushan Kumar) भारवला आहे. त्याने कार्तिकला एक महागडी कार भेट दिली आहे. 


'शमशेरा'चे नवे पोस्टर आऊट; हाहात कुऱ्हाड, विखुरलेले लांबलचक केस...रणबीरचा दमदार लूक


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'शमशेरा' (Shamshera) सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अशातच निर्मात्यांनी 'शमशेरा'चे नवे पोस्टरदेखील रिलीज केले आहे. 


सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 तमिळ चित्रपटांच्या यादीत 'विक्रम'चं नाव सामील


सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कमल हसनचा (Kamal Hassan)  'विक्रम' (Vikram)  हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 390.50 कोटींची कमाई केली. हा चित्रपट लवकरच  400 कोटींचा टप्पा पार करणार आहे, असं म्हटलं जात आहे. विक्रम या चित्रपटचं नाव जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 तमिळ चित्रपटांच्या यादीत सामील झालं आहे. 


ठरलं! 'हेरा फेरी-3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; निर्मात्यांनी दिली माहिती


 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'हेरा फेरी' या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar) , सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते  फिरोज नाडियादवाला (Firoz Nadiadwala) यांनी हेरा फेरी-3 (Hera Pheri 3) या चित्रपटाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.