Sarsenapati Hambirrao : 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आता या सिनेमाने पाचव्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे.
सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाचव्या आठवड्यातदेखील सिनेमागृहात प्रेक्षक गर्दी करत आहेत. अशातच प्रविण तरडेंची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रविण तरडेंनी लिहिले आहे, आज जोरदार पाचवा आठवडा सुरू झाला आहे...सरसेनापतींचा भव्यदिव्य इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्यातच खरं सुख... नक्की बघा जवळच्या चित्रपटगृहात".
'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. ‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’ अशी गर्जना ऐकून आली आणि प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली. त्यामुळे आता सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक सहकुटुंब सहपरिवार हा सिनेमा पाहत आहेत. . 'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट' असे डायलॉग या सिनेमात आहेत.
कलाकारांनी केले सिनेमाचे कौतुक!
अनेक कलाकारदेखील हा सिनेमा आवर्जून बघत आहेत. तसेच त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रविण तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या