एक्स्प्लोर

Mi Savitribai Jyotirao Phule Marathi serial: 'मी सावित्रीबाई ..' मालिका युट्यूबवर सुरू होताच अमोल कोल्हेंच्या दोन नव्या घोषणा; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

'मी सावित्रीबाई ..' मालिका युट्यूबवर सुरू होताच अमोल कोल्हेंच्या दोन नव्या घोषणा; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

Mi Savitribai Jyotirao Phule Marathi serial: अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान मिळविणारी ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान मिळवलेली ही मालिका 20 जूनपासून ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे. ‘मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासात प्रथमच एखादी मालिका अशा स्वरूपात पुनरागमन करत आहे. फुले दांपत्यांनी समाजपरिवर्तनासाठी दिलेला लढा, शिक्षणाची क्रांती आणि समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा, हाच या पुनर्प्रवासामागील आमचा उद्देश आहे. ही मालिका केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जाणीव जागवणारी आणि प्रेरणा देणारी चळवळ आहे’, असे या मालिकेच्या डिजीटल प्रवासाबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत असे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले. यावेळी मालिके संदर्भात त्यांनी दोन घोषणा केल्या. यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मालिकेचा डिजिटल प्रवास

याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा हा डिजीटल प्रवास अनेक निर्मात्यांसाठी पथदर्शी ठरू शकतो. या प्रवासाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून अनेक मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या उपक्रमाबद्दल सकारात्मक भावना आणि उत्सुकता निश्चितच आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर अभिव्यक्तीची आणि मांडणीची अधिक व्यापक संधी उपलब्ध असते. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत कथा ज्या स्वरूपात पोहोचवायची आहे, ती अधिक प्रभावीपणे मांडता येते. तसेच, या विषयाला व्यापक स्वरूप देण्यासाठी आपण भविष्यात संसदेतही हा मुद्दा मांडणार असल्याचे संकेत डॉ.अमोल कोल्हे यांनी दिले.  

मालिका पाच भाषांमध्ये होणार डब

‘सध्या ही मालिका सर्वप्रथम ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर डिजीटल माध्यमांवर विस्तार करण्याचा आमचा विचार आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत असून योग्य वेळेनुसार पुढील निर्णय घेतले जातील. येत्या काळात हिंदी, तामिळ, तेलगू, इंग्रजी, बंगाली या पाच विविध भारतीय भाषांमध्ये डब करून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले. 

गुणवंत कलाकारांना मिळणार मालिकेत संधी

डिजीटल माध्यमामुळे कलाकार आणि निर्मात्यांमधील अंतर कमी होत असल्याचे सांगत डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, ‘आमच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर ऑडिशन टॅब सुरू केला असून, महाराष्ट्रातील नवोदित आणि गुणवंत कलाकारांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे कलाकारांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट आमच्याशी जोडता येईल.’ सर्जनशीलतेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत मालिकेच्या डिजीटल प्रवासाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी शब्दांत सांगितले कि आता ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका केवळ आमची राहिलेली नाही, तर ती आता संपूर्ण महाराष्ट्राची मालिका झाली आहे.

"मराठी मनोरंजन क्षेत्रात आशयप्रधान आणि लोकाभिमुख कंटेंटसाठी नवे मार्ग खुले करण्याच्या उद्देशाने आम्ही सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात अनेक सर्जनशील प्रयोगांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
Cocktail 2 OTT Release: थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Embed widget