एक्स्प्लोर

MI Honar Superstar Chote Ustad 4 Winner: महाराष्ट्राला मिळाले 6 नवे स्टार! पण छोटे उस्ताद 4 च्या ट्रॉफीवर नाव कोरलं ‘या’ स्पर्धकाने

chote ustad 4: या कार्यक्रमाने एक नाही तर सहा सुपरस्टार महाराष्ट्राला दिले आहेत. या सर्व स्पर्धकांच्या पुढील वाटचालीसाठी स्टार प्रवाह परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

Star Pravah Chote Ustad Winner: स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. वीरा हाक्के, शुभ्रा खाडे, अस्मिता गादेकर, अर्णव बोपलकर, ईशानी हिंगे आणि गंधर्व चामनर या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत कोल्हापूरच्या शुभ्रा खाडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. शुभ्रा खाडेला तीन लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. तर द्वितीय क्रमांक पटकावला नांदेडच्या वीरा हाक्केने. तृतीय क्रमांक नाशिकच्या अस्मिता गादेकर आणि ठाण्याचा अर्णव बोपलकर यांना विभागून देण्यात आला. तर पुण्याची ईशानी हिंगे आणि गंधर्व चामनर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं. 

विजेती झाल्यावर काय म्हणाली शुभ्रा ?

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना शुभ्रा खाडे म्हणाली, ‘हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी स्पर्धेत भाग घेऊ शकले. या मंचाने फक्त गाणंच नाही तर मला आत्मविश्वासही दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत सर यांचे विशेष आभार. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. स्टार प्रवाहने मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या रुपात नव्या पाढीसाठी हा मंच खुला करुन दिला आहे त्यांची देखिल मी ऋणी आहे.’

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

शुभ्रा खाडे जरी या पर्वाची विजेती असली तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. या कार्यक्रमाने एक नाही तर सहा सुपरस्टार महाराष्ट्राला दिले आहेत. या सर्व स्पर्धकांच्या पुढील वाटचालीसाठी स्टार प्रवाह परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

 

महत्त्वाच्या बातम्या

दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget