Meet First Indian Actor To Charge One Crore Per Film: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांच्या फिबाबत आपल्या सर्वांनाच माहिती आहेच. बॉलिवूडचे टॉपचे सेलिब्रिटी कित्येक कोटींची फी घेत असतात. पण, तुम्हाला सर्वात आधी चित्रपटासाठी एक कोटींचं मानधन घेणाऱ्या स्टारबाबत माहिती आहे का?
बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) असो वा, किंग खान (Shah Rukh Khan) किंवा मग परफेक्शनिस्ट आमीर खान (Aamir Khan)... हे स्टार्स आपल्या चित्रपटांसाठी कोटींचं मानधन आकारतात. या यादीत अक्षय कुमार आणि अजय देवगणसारख्या स्टार्सचाही समावेश होतो. पण कोणत्याही चित्रपटासाठी एक कोटींचं मानधन घेणाऱ्या स्टार्समध्ये या सर्व सुपरस्टार्सचा नंबर नंतर लागतो. पण, हा बॉलिवूड स्टार नाही बरं का... सर्वात आधी कोटींचं मानधन घेणारा पहिला सुपरस्टार म्हणजे, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारा चिरंजीवी.
एक कोटींची फी घेणारा पहिला सुपरस्टार...
कोट्यवधी रुपयांचं मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत चिरंजीवीचं नाव सर्वात आधी येतं. लाखोंचा टप्पा ओलांडून कोट्यवधींचं मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता म्हणजे, साऊथ सुपरस्टार चिरंजीव. हा मेगास्टार तेलुगु सिनेमात काम करून देशभरात प्रसिद्ध झाला. चिरंजीवीनं तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना 1992 मध्ये 'आपडबांधवडू' या चित्रपटासाठी नंदी पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटासाठी चिरंजीवीला 1 कोटी 25 लाख रुपये फी ऑफर करण्यात आली होती. त्यानंतर तो त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनलेला.
अमिताभ बच्चनही होते मागे...
अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अव्वल अभिनेते होते. पण त्यांची फीही त्यावेळी फारशी नव्हती. डीएनएच्या वृत्तानुसार, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी एका चित्रपटासाठी 90 लाख रुपये घेतले होते. 1996 मध्ये अमिताभ बच्चन यांनी 1 कोटी मानधन घेण्यास सुरुवात केली होती. चिरंजीवीला एक कोटी रुपये फी मिळाल्यानंतरच कमल हासन आणि रजनीकांत सारख्या स्टार्सनी फी वाढवायला सुरुवात केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Prime Video वरच्या 'या' 5 हिंदी कॉमेडी वेब सिरीज पाहिल्यात का? नक्की पाहा, खळखळून हसवतात!