Hemant Patil: नांदेड दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेन बैठक घेत महानगर अध्यक्ष दिलीप कंडकुर्थे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी महायुतीचे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली.  शिवसेना पदाधिकारी यांनी बैठक घेत हा निर्णय घेतला आहे. जर बंडखोरी मागे घेतली नाही तर नांदेडच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना काम करणार नाही. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती.


काँग्रेस उमेदवाराची सुपारी घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करण्याचं काम बंडखोराने केलेलं आहे. 2019 ला देखील असंच झालं होतं. लोकसभेचा उमेदवार देखील महायुतीचा आहे, अशावेळी समन्वय असलं पाहिजे. बंडखोरी थांबल्यास लोकसभेची आणि विधानसभेची जागा निवडून यायला मदत होईल, अशी भूमिका शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. भाजपाचे सगळे पदाधिकारी आमच्यासोबत असल्याचा दावा देखील हेमंत पाटील यांनी केला. तसेच बंडखोर उमेदवार वर्षाच्या दारावर होता. त्यानंतर आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराकडून कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि नुकसान टाळणं अतिशय गरजेचे असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले. तसेच प्रत्येक निवडणुकीत काय धन दानग्यांनीच उभे राहावे का?; नांदेड दक्षिण मधील बंडखोरांना हेमंत पाटील यांनी सुनावले. दरम्यान, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून श्री आनंदराव बोंढारकर यांनी व नांदेड लोकसभा पोट निवडणुकीकरिता महायुतीकडून भाजपचे डॉ.संतुकाराव हंबर्डे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. 


2019 च्या निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?


नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी 3592 मतांच्या फरकाने अपक्ष दिलिप व्यंकटराव कंदकुर्ते यांचा पराभव करुन जागा जिंकली.नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभा (एमपी) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा 59442 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. मात्र, मागच्या काही दिवसापूर्वी खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. 


संबंधित बातमी:


Maharashtra Assembly Elections 2024 : बार्शीत पुन्हा पारंपारिक लढत, दिलीप सोपल नवव्यांदा रिंगणात, आजवर सात चिन्हं बदलली, तर राजेंद्र राऊतांनी..