Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि  कवयित्री माया गोविंद (Maya Govind) यांचे आज (7 एप्रिल) मुंबई येथे निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 350 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमधील गाणी त्यांनी लिहिली होती.

  


त्यांच्या मुलानं म्हणजेच अजय गोविंद यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, माया गोविंद यांचे निधन आज सकाळी 9.30 वाजता जुहू येथील त्यांच्या घरी झाले. त्यांनी सांगितले, 'गेल्या चार महिन्यामध्ये दोन वेळा माया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण  रुग्णालयात योग्य पद्धतीन उपचार होत नसल्यानं माया गोविंदा यांच्यावर घरीच उपचार सुरू केले.'
 
माया गोविंद यांच्या निधना आधी अजय गोविंद  यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. तेव्हा ते म्हणाले होते,  '27 ते 31 डिसेंबर या दरम्यान माया गोविंद यांना आरोग्य निधी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांना यूरीन इंफेक्शन आणि काही अन्य समस्या जाणवत होत्या. पण नंतर जेव्हा पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा 20 जानेवारी रोजी त्यांना पुन्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान लक्षात आलं की त्यांना  ब्रेन ब्लड क्लॉटिंग झालं आहे.'


माया गोविंद यांचा जन्म 1940 मध्ये लखनऊ येथे झाला. 1972 मध्ये त्यांनी संगीत क्षेत्रातील त्यांच्या करिअरला सुरूवात केली.  आरोप, जलते बदन, सावन को आने दो, बेकाबू, दमन, टक्कर, पायल की झंकार, बाल ब्रह्मचारी, आर या पार, गर्व, लाल बादशाह, बांवरी हमेशा, चाहत, ईमानदार, तोहफा मोहब्बत का, अनमोल, याराना, दलाल, गज गामिनी, गंगा की कसम, हम तुम्हारे है सनम यांसारख्या 350 पेक्षा जास्त हिट चित्रपटांमधील गाणी माया यांनी लिहिली आहेत. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha