एक्स्प्लोर

Matka King: अमिरी, जुगार आणि मटक्याचा काळा धंदा! नागराज मंजुळेंचा रिॲलिटी चेक आता OTTवर बसणार; ‘Matka King’चा ट्रेलर पाहिलात?

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ही नवी निर्मिती एका अशा जगात घेऊन जाते, जिथे ‘मटका’ हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे.

Matka King: सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या दर्जेदार प्रोजेक्ट्समधून मातीतल्या वास्तववादी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे दिग्दर्शक-निर्माते नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule)आता ओटीटीवर नव्या अवतारात झळकणार आहेत. मटका किंग या वेबसिरीजच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा एका जबरदस्त कथानक घेऊन समोर आले आहेत. या वेब सिरीजची सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे. ओटीटीवर येणारी 'मटका किंग' (Matka King) ही वेब सिरीज केवळ एक गुन्हेगारी कथा म्हणून पाहणं मोठी चूक ठरेल. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ही नवी निर्मिती एका अशा जगात घेऊन जाते, जिथे ‘मटका’ हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे.

जुगारापलीकडचं वास्तव

‘मटका किंग’ची कथा एका अशा काळात घडते, जेव्हा मटका हा केवळ खेळ नव्हता, तर अनेकांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता. या जगात पैसा जितक्या वेगाने येतो, तितक्याच वेगाने माणसाला गिळतोही. मालिका या जगाच्या ग्लॅमरला फक्त पृष्ठभागावर ठेवत नाही, तर त्यामागचं काळं वास्तव उघड करत जाते. एक अशी दुनिया, जी कधीकाळी जगली गेली होती, आणि एक असा व्यक्तिरेखा, जी निरीक्षण आणि अनुभवातून घडवली गेली,हे दोन्ही प्राइम व्हिडिओच्या “मटका किंग” मध्ये एकत्र येतात. 

विजय वर्मासोबत काम करण्याचा अनुभव

विजय वर्मासोबत काम करण्याबद्दल आणि बृज भाटी घडवण्याबद्दल, नागराज म्हणतात, “विजय एक उत्कृष्ट अभिनेता आहे, आणि त्याच्यातली मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तो आपल्या व्यक्तिरेखेवर खूप खोलवर विचार करतो. प्रत्येक सीनमध्ये त्याचा पात्र असं का वागतोय, हे समजून घेण्यासाठी तो सतत प्रश्न विचारतो. आम्ही अनेकदा शूटिंगपूर्वी बसून सीनवर चर्चा करत असू. मी नेहमी थोडी मोकळीक ठेवतो, जेणेकरून शेवटच्या क्षणी बदल करता येतील, आणि विजयचे प्रश्न आम्हाला आमच्या मर्यादेपलीकडे घेऊन गेले. त्यामुळे प्रत्येक सीन अधिक चांगला बनला, कारण मटका किंग हा बारकाव्यांचा खेळ आहे. त्याने खूप संयमाने काम केले आणि या भूमिकेत आपलं पूर्ण मन ओतलं. आता जेव्हा तुम्ही हे पाहाल, तेव्हा तो खरोखर या मालिकेत हिरोसारखा दिसतो.”

मटक्याच्या जगाला लहानपणापासून ओळखतो..

मटका जगाबद्दल पहिली प्रतिक्रिया सांगताना, नागराज म्हणतात, “ जेव्हा आशीष (आर्यन) आणि अश्विनी (सिडवाणी) माझ्याकडे मटका किंगची कल्पना घेऊन आले, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की हे माझ्या लहानपणी खूप लोकप्रिय होतं. नंतर जेव्हा आम्ही सिद्धार्थ (रॉय कपूर) सरांसोबत कथा आखत होतो, तेव्हा मला वाटलं की ही एक रंजक दुनिया आहे जी मी लहानपणापासून ओळखतो. त्यामुळे या कल्पनेबद्दल मी खूप उत्साहित झालो.”

बृज भाटी या व्यक्तिरेखेला समजून घेताना, त्यांनी सांगितले, “मी बृज भाटीसारखे अनेक लोक पाहिले आहेत. जेव्हा आम्ही ही व्यक्तिरेखा लिहित होतो, तेव्हा मला जाणवलं की तो एक अत्यंत बुद्धिमान माणूस आहे, जवळजवळ एखाद्या शास्त्रज्ञासारखा. त्याने एक खेळ निर्माण केला, आणि तो तयार करण्यासाठी धाडस लागतं. पण त्याची खरी ताकद म्हणजे त्याची प्रामाणिकता आहे.”

 

कलाकारांची तगडी फौज

अभय कोराणे यांनी क्रिएट आणि लिहिलेली, तसेच नागराज पोपटराव मंजुळे यांनी क्रिएट, लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जडावत आणि गुलशन ग्रोवर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. याशिवाय भारत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीव्हर, किशोर कदम, सायरस सहुकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. 

कुठे पाहता येणार? 

17 एप्रिलपासून Amazon Prime Video वर प्रदर्शित होणारी ही मालिका, मजबूत लेखन, वास्तववादी दिग्दर्शन आणि दमदार अभिनयामुळे या वर्षातील सर्वात चर्चेत राहणाऱ्या प्रोजेक्ट्सपैकी एक ठरू शकते. जर तुम्हाला ‘रॉ’, वास्तववादी आणि पात्रप्रधान कथा आवडत असतील, तर ‘मटका किंग’ तुमच्यासाठी परफेक्ट बिंज असू शकते.

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget