एक्स्प्लोर

'मस्ती 4' फेम अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं; फेक नंबरवरून 'नको ते चॅट्स' व्हायरल', चाहतेही भडकले

Ruhi Singh Reacts After Fake Obscene Chats: मस्ती 4 फेम अभिनेत्री रूही सिंह फसवणुकीला बळी. फेक व्हॅट्सअॅप चॅट्स केले शेअर.

Ruhi Singh Warns Fans After Fake WhatsApp Chats Surface: मनोरंजन सिनेसृष्टीतून खळबळजनक बातमी समोर येत आहे. 'मस्ती 4'या  चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रूही सिंह  एका फसवणुकीला बळी पडली आहे. तिच्या नावाचा वापर करत अश्लील चॅट्स व्हायरल केले जात होते. या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स लीक झाले आहेत. या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स समोर येताच रूहीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे.  हे चॅट्स तिनं केले नसल्याचा दावा अभिनेत्रीनं केला आहे. तिनं सोशल मीडियावर या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. तसेच चाहत्यांना या मोठ्या फसवणुकीबद्दल सावध केले आहे. हे प्रकरण समोर येताच रूही सिंहच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

8 फेब्रुवारी रोजी रूहीनं एक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं फेक व्हॉट्सअॅप अकाउंटची माहिती दिली.  तिनं पोस्टद्वारे पोलीस  तक्रार दाखल करत असल्याची माहिती दिली. तसेच चाहत्यांना 6369584327 नंबर त्वरीत ब्लॉक करून तक्रार करण्याचे आवाहन केले. रूहीने स्पष्ट केले की, त्या चॅट्स तिच्या नाहीत आणि नंबरही तिचा नाही. फसवणूक करणारा व्यक्ती तिच्या नावाचा वापर करून  लोकांशी चॅट्स करत आहे.  या नंबरवर अजिबात विश्वास ठेवू नका, असं तिनं सांगितलं. या चॅट्समध्ये ती व्यक्ती कुणाशीतरी फोटोशूटबद्दल  गप्पा मारत असल्याचं दिसून येत आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruhii Siingh (@ruhisingh12)

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना रूहीनं लिहिले की, कुणीतरी तिच्या ओळखीचा वापर करून लोकांना मेसेज पाठवत आहेत.  तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिनं स्पष्ट इशारा देत लिहिले की,  'ही मी नाही. जर तुम्हाला कुणीही संशयास्पद नंबरवरून मेसेज पाठवले, तर कृपया त्यांना ब्लॉक करा'. तिनं पुढे नाराजी व्यक्त करत लिहिले की, 'एखाद्याची ओळख चोरत आहात? काहीतरी चांगलं काम करा. तुमचे आयुष्य जगा. मी पोलीस तसेच सायबर क्राइमकडे तक्रार दाखल करत आहे, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं.

रूही सिंह ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.  तिचा जन्म जयपूरमध्ये झाला.  तिनं 2015 साली मधुर भांडारकार यांच्या कॅलेंडर गर्ल्स या चित्रपटातून  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  तिला अद्याप  इंडस्ट्रीमध्ये फारशी ओळख मिळाली नाही. या कारणामुळे ती प्रकाशझोतात आली आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Box Office collection: 'धमाल 4'च्या कमाईला मोठा ब्रेक! सहाव्या दिवशी 31.6% घसरण; 'अल्फा'च्या गटांगळ्या, 'वेलकम टू द जंगल'चीही दमछाक
'धमाल 4'च्या कमाईला मोठा ब्रेक! सहाव्या दिवशी 31.6% घसरण; 'अल्फा'च्या गटांगळ्या, 'वेलकम टू द जंगल'चीही दमछाक
Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget