एक्स्प्लोर

Marathi Natak Shantecha Karta Chalu Aahe: लक्ष्मीकांत बेर्डे सर.. लक्ष असू द्या! खळखळून हसवणारं 'शांतेचं कार्ट' पुन्हा रंगभूमीवर; प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत

लक्ष्मीकांत बेर्डे सर.. लक्ष असू द्या! खळखळून हसवणारं 'शांतेचं कार्ट' पुन्हा रंगभूमीवर; देव्हाऱ्यात फोटो ठेवत प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत

Marathi Natak Shantecha karta Chalu Aahe: मराठी रंगभूमीवर गाजलेलं विनोदी नाटक 'शांतच कार्ट चालू आहे' (Shantecha Karta Chalu Aahe) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 1983 साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने त्या काळात मोठं यश मिळवलं होतं . लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा आणि लाली जोग यांच्या अभिनयामुळे हे नाटक विशेष गाजलेलं. पण covid काळात थांबलेलं हे नाटक 217 प्रयोगांनंतर पुन्हा नव्या जोमात सादर केलं जात आहे.  नुकताच 11 एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात या नाटकाचा प्रयोग झाला. या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान, अभिनेता प्रियदर्शन जाधवने (Priyadarshan Jadhav) देव्हाऱ्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो ठेवत एक खास पोस्ट केलीये. 'लक्ष्मीकांत बेर्डे सर लक्ष असू द्या ! तुमच्यासारखेच आमच्यावरसुद्धा प्रेक्षक प्रेम करतील आणि शांतीच कार्ट चालूच राहील अशी आशा बाळगतो' असं त्याने लिहिले आहे. या पोस्टची सध्या चर्चा रंगलीय. 

काय म्हणाला प्रियदर्शन ?

"१९८३ साली शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक रंगभूमीवर आलं आणि अक्षरशः धुमाकूळ घातला या नाटकाने. लक्ष्मीकांत बेर्डे सुधीर जोशी नयनतारा लाली जोग यांनी त्यांच्या भूमिका अजरामर करून ठेवल्या. नाटक तुफान गाजले. श्रीनिवास भणगे लिखित आणि " प्रकाश बुद्धीसागर " दिग्दर्शित हे नाटक सुपरहिट ठरलं. बुद्धीसागर काय कमाल करू शकतात ह्या नाटकाने सिद्ध झालं आणि पुढे त्यांनी अनेक सुपरहिट नाटके दिग्दर्शित केली.

आज त्याच नाटकाचा नव्याने प्रयोग होत आहे. 217 प्रयोग केल्यानंतर कोविड मुळे नाटक बंद पडले. आता नाटक पुन्हा नव्या दमाने सुरू होत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे इतकं धमाकेदार काम मला करताच येणार नाही पण तरीही जमेल तेवढं उत्तम करायचा प्रयत्न करेन. #लक्ष्मीकांत बेर्डे सर.... लक्ष असू द्या ! तुमच्यासारखेच आमच्यावर सुद्धा प्रेक्षक प्रेम करतील आणि शांतेच कार्ट "चालूच" राहील अशी आशा बाळगतो. बाकी................. मजेत !"
प्रेक्षकांना नम्र विनंती : खळखळून हसायचं असेल..... तर कार्ट चालूच आहे !

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyadarshan Jadhav (@priyadarshanjadhavv)

कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या नाटकातून घेतला जातो. त्यामुळेच हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'आता बघवत नाहीय' सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आख्खं बॉलिवूड एकवटलं! सोनाक्षी सिन्हासह, या सेलिब्रेटींचे सरकारला थेट सवाल
'आता बघवत नाहीय' सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आख्खं बॉलिवूड एकवटलं! सोनाक्षी सिन्हासह, या सेलिब्रेटींचे सरकारला थेट सवाल
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
DEool Band Child Actress:'देऊळ बंद' नंतर डोक्यात हवा गेली, 'त्या' आगाऊ कमेंटनंतर आईने व्हॅनिटीत नेऊन अक्षरशः तुडवलं; अभिनेत्रीची कबुली
'देऊळ बंद' नंतर डोक्यात हवा गेली, 'त्या' आगाऊ कमेंटनंतर आईने व्हॅनिटीत नेऊन अक्षरशः तुडवलं; अभिनेत्रीची कबुली
Paresh Raval on Exit Politics:भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज'कारण'
भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज'कारण'

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget