एक्स्प्लोर

Marathi Natak:थेट स्टेजवर ट्रेलर? नाटकाच्या स्टेजवर प्रेक्षकांचा श्वास रोखणारा 'हा' अनोखा प्रयोग; नेमकं होणार काय?

प्रेक्षकांना नाटकाची केवळ झलक नाही, तर त्याचा 'फील' प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

Marathi Natak: मराठी रंगभूमीवर सध्या वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत असतानाच 'आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!' हे नाटक आता आणखी एका भन्नाट गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर आणि अनोख्या प्रोमोमधून या नाटकाची घोषणा झाली होती आणि आता या नाटकाचा ट्रेलर थेट रंगमंचावर, लाईव्ह परफॉर्मन्सच्या रूपात सादर केला जाणार आहे.

खास लाईव्ह ट्रेलरने वाढवली उत्सुकता 

1 मे 2026 रोजी 'जर तर ची गोष्ट' या लोकप्रिय नाटकाच्या 350 व्या प्रयोगादरम्यान हा खास लाईव्ह ट्रेलर सादर केला जाणार आहे. एकीकडे 'जर तर ची गोष्ट' हा महत्त्वाचा टप्पा गाठत असताना, त्याच मंचावर दुसऱ्या नव्या नाटकाची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, हीच या नाटकांची खासियत ठरणार आहे. आजवर ट्रेलर म्हणजे स्क्रीनवर पाहायची गोष्ट, असा प्रेक्षकांचा अनुभव आहे. मात्र ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा ट्रेलर थेट कलाकारांच्या जिवंत अभिनयातून, प्रकाशयोजना आणि संगीताच्या साथीने सादर होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नाटकाची केवळ झलक नाही, तर त्याचा 'फील' प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

काय आहे नाटकाचा विषय?

हे नाटक एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांमधील नातेसंबंध, विचारसरणी आणि बदलत्या जीवनशैलीतील संघर्ष हलक्याफुलक्या आणि रिलेटेबल पद्धतीने मांडणार आहे. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना हे नाटक आपलंसं वाटेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे. सोनल प्रॉडक्शन्सकडून नेहमीच मार्केटिंगमध्ये नवनवीन प्रयोग केले जातात. 'दादा एक गुड न्यूज आहे'पासून त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे वेगळे मार्ग वापरले आहेत. त्याच परंपरेतून 'आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!'चा लाईव्ह ट्रेलर हा एक नवा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे.

सिनेमासारखं नाटकासाठीही लाईव्ह ट्रेलर

निर्माते नंदू कदम म्हणतात, ''प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायचं असतं. आमचा कायम हट्ट असतो की, पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. माध्यमांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला पाहिजे. फक्त पारंपरिक मार्केटिंग करून चालणार नाही. त्यातूनच ही कल्पना सुचली. या लाईव्ह ट्रेलरमधून आम्ही प्रेक्षकांना नाटकाची एक झलक दाखवणार आहोत. ती झलक त्यांना आवडली, तर ते नक्कीच नाटक पाहायला येतील, अशी आम्हाला खात्री आहे.''

प्रेक्षकांची उत्सुकता वाढली 

सोनल प्रॉडक्शन्स निर्मित आणि प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे. नाटकाचे लेखन अमोल पाटील यांनी केले असून दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केलं आहे. लाईव्ह ट्रेलरच्या या अनोख्या प्रयोगामुळे 'आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!' हे नाटक प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे. आता १ मे रोजी माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृह येथे चार वाजता सादर होणाऱ्या या ट्रेलरमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget