एक्स्प्लोर

Tula Pahata Teaser Launch: वेळ बदलते, पण भावना... तरल प्रेमाची अनवट कहाणी; 'तुला पाहता' सिनेमाचा रंजक टीजर लाँच

Tula Pahata Teaser Launch: ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी 'तुला पाहता' या सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन ही मयुरा प्रधान यांचंच आहे.

Tula Pahata Teaser Launch: ऐन तारुण्यात, प्रेमात आकंठ बुडालेले असताना तो अचानक तिच्या आयुष्यातून निघून जातो आणि काही वर्षांनी तसाच अचानक परततो तो निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून.. त्याच्या अचानक जाण्यानं आणि पुन्हा परतण्यानं तिच्या आयुष्यात काय खळबळ उडते त्याची तरल कहाणी तुला पाहता या चित्रपटातून उलगडणार आहे. 10 जुलैला हा चित्रपट मराठीसह हिंदीतही प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. 

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी 'तुला पाहता' या सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन ही मयुरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, अभिनेत्री इला भाटे, निशिगंधा वाड, मानसी पाटील, नचिकेत लेले, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे.

Tula Pahata Teaser Launch: वेळ बदलते, पण भावना... तरल प्रेमाची अनवट कहाणी; 'तुला पाहता' सिनेमाचा रंजक टीजर लाँच

कुटुंबांतील वेगवेगळ्या पिढ्यांची गोष्ट आता 'तुला पाहता' या चित्रपटातून उलगडणार आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा तरुण एक जोडपं असतं तेव्हा काय काय घडतं याची रंजक गोष्ट 'तुला पाहता' या चित्रपटातून उलगडणार आहे. एका तरल प्रेमकहाणीची झलक टीजरमधून दाखवण्यात आली आहे. पण या टीजरपलीकडेही या चित्रपटाच्या कथेत आणखी अनेक पदर आहेत. हे पदर ट्रेलरमधून आणखी काही प्रमाणात उलगडतील अशी अपेक्षा आहे. चित्रपटाचा पोत, छायांकन, पार्श्वसंगीतामुळे चित्रपटाचा गुणवत्तापूर्ण स्तर दिसून येतो. 

चित्रपटाच्या पोस्टर, त्यातील कसदार अभिनेत्यांच्या फळी यामुळे 'तुला पाहता' हा चित्रपटाविषयीची उत्सुकता आता टीजरमुळे आणखी वाढली आहे. एक नवा दृष्टिकोन घेऊन प्रेक्षकांसमोर येणारा हा चित्रपट पाहण्यासाठी 10 जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टीझर पाहिलात?

महत्त्वाच्या इतर बातम्या :                                                                                 

Gullak 5 Sony Liv Web Series: 'गुल्लक'च्या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना झटका; लोकप्रिय अभिनेता दिसणार नाही, त्याऐवजी...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Musafir Cafe in Real: विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे'ने सगळ्यांनाच घातली भुरळ; प्रत्यक्षात हा कॅफे नेमका कुठे आहे माहितीय?
विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे'ने सगळ्यांनाच घातली भुरळ; प्रत्यक्षात हा कॅफे नेमका कुठे आहे माहितीय?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget