Follower Marathi Movie: सीमाभागातील मराठी (Marathi), कन्नड भाषावादाची (Kannada Language) पार्श्वभूमी आणि तीन मित्रांची रंजक कथा असलेल्या 'फॉलोअर' (Follower Movie) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer Released) नुकताच सोशल मीडियावर (Social Media) लाँच करण्यात आला आहे. नव्या दमाच्या कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय उत्तम आणि गुंतवणारा आहे. येत्या 21 मार्चला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Continues below advertisement


'फॉलोअर'ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र, हर्षद नलावडे  हे या चित्रपटाचे निर्माते असून राघवन भारद्वाज, चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांचे असून निभावली असून रघु बसरीमारद, डोना मुन्शी आणि हर्षद नलावडे यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रण, मौलिक शर्मा संकलक, सम्यक सिंग यांनी लिहिलेल्या गीतांना सम्यक सिंह आणि अभिज्ञान अरोरा यांचे संगीत लाभले असून ही गाणी सम्यक सिंग यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत. 


महाराष्ट्राच्या सीमाभागात मराठी, कन्नड भाषेचा वाद हा गेली अनेक वर्षांपासून आहे. सीमावादाने ग्रस्त असलेल्या बेलगाव शहरात घडणाऱ्या या कथेत, एका कट्टर विचारसरणीच्या पत्रकाराला आपल्या समाजावरील अत्याचार उघड करण्यावर विश्वास आहे. पण त्याचा हा विश्वास शहरातील एका कट्टर नेत्यांनी पसरवलेल्या अपूर्ण आणि एकतर्फी सत्यावर आधारलेला आहे. त्याशिवाय चित्रपटाला प्रेमकहाणी, वडील-मुलगा यांच्यातील संघर्ष असेही पदर असल्याचं जाणवतं.  मराठी, कन्नड, हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट आहे. आगळावेगळा विषय, संयत पद्धतीनं केलेली मांडणी, नव्या दमाचे कलाकार हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे 'फॉलोअर'ला चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर पाहावा लागणार आहे.


पाहा ट्रेलर : 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Friday OTT Releases: होळीच्या सुट्ट्यांमध्ये एंटरटेनमेंटचा ओव्हरडोस; OTT वर 'या' फिल्म्स, वेब सीरिजचा मसाला