Friday OTT Releases: यंदाचा आठवडा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन आला आहे. येत्या शुक्रवारी एकापेक्षा एक सरस चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होणार आहेत. यामध्ये अॅक्शन, कॉमेडी, सस्पेंस आणि थ्रिलचा मसाला प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे होळीच्या सुट्टीला काहीतरी नवं पाहण्याचा विचार करत असाल, तर नव्यानं रिलीज होणाऱ्या या सीरिज आणि वेब सीरिज तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स ठरतील.
बी हॅप्पी (Be Happy)
बी हॅप्पी काळजाचा ठाव घेणारं कथानक आहे, ज्यामध्ये शिव रस्तोगी (अभिषेक बच्चन), जो एक सिंगल फादर आहे आणि आपली मुलगी धारा (इनायत वर्मा)ची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्वच्या सर्व प्रयत्न करताना दिसणार आहे. धाराचं स्वप्न आहे की, ती भारताच्या सर्वात मोठ्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परफॉर्म करेल, पण या प्रवासात बापलेकीला समाजाच्या अपेक्षा, वैयक्तिक आयुष्यातील आव्हानं यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. ही फिल्म 15 मार्च 2025 रोजी रिलीज केली जाणार असून अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.
द वील ऑफ टाईम: सीजन 3 (The Wheel of Time : Season 3)
द वील ऑफ टाईम सीजन 3 तुमच्या स्क्रिनवर परत येत आहे आणि यावेळी कथा आणखी रहस्यमयी आणि रोमांचक असणार आहे. तुम्ही ते 14 मार्च 2025 पासून Amazon Prime Video वर पाहू शकता.
एजंट (Agent)
एजंट एक दमदार तेलुगु स्पाई थ्रिलर आहे, जी तुम्हाला हेरगिरी, धोका आणि जबरदस्त अॅक्शनच्या जगात घेऊन जाते. ही कथा रिकी (अखिल अक्किनेनी) भोवती फिरते, जो एक निर्भय आणि अप्रत्याशित गुन्हेगार आहे, ज्याच्या अनोख्या युक्त्या त्याला अनेकदा अडचणीत आणतात. हाय-ऑक्टेन अॅक्शन आणि सस्पेन्सनं परिपूर्ण, एजंट 13 मार्च 2025 पासून सोनीलिव्हवर स्ट्रीम होईल, या रोमांचक प्रवासासाठी सज्ज व्हा.
द इलेक्ट्रिक स्टेट (The Electric State)
द इलेक्ट्रिक स्टेट एक रोमांचक या साय-फाय अॅडवेंचर चित्रपटात मिली बॉबी ब्राऊन एका किशोरवयीन मुलीची भूमिका साकारते, जी तिच्या हरवलेल्या भावाच्या शोधात एका रोबोट साथीदारासोबत प्रवासाला निघते. रुसो ब्रदर्स दिग्दर्शित या चित्रपटात के हुई क्वान, जेसन अलेक्झांडर आणि जियानकार्लो एस्पोसिटो यांच्या भूमिका आहेत. द इलेक्ट्रिक स्टेट 15 मार्च 2025 पासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.
लव्ह इज ब्लाइंड: स्वीडन सीजन 2 (Love is Blind: Sweden - Season 2)
पुन्हा एकदा प्रेमाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देत आहे. जेसिका अल्मेनेस यांनी सूत्रसंचालन केलेल्या या शोमध्ये स्वीडिश सिंगल्स एकमेकांना प्रत्यक्ष न पाहता त्यांच्या हृदयातून जोडण्याचा प्रयत्न करताना दिसतील. ही सीरिज 12 मार्च 2025 पासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.
वनवास (Vanavasa)
नाना पाटेकर आणि गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा यांचा 'वनवास' हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यास सज्ज आहे. हा चित्रपट 14 मार्चपासून म्हणजेच, होळीच्या आठवड्याच्या शेवटी ZEE5 वर पाहता येईल. वनवास ही एका वृद्ध विधुराची कथा आहे, जो अजूनही त्याच्या पत्नीच्या मृत्यूचा शोक करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
