एक्स्प्लोर

बाप-लेकीच्या नात्याचा भावनांचा हळवा प्रवास! ‘द्विधा’चा टीझर पाहून डोळे पाणावतील, 'या' तारखेला होणार सिनेमा रिलीज

‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे

Marathi Movie Teaser Out: बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात  आला असून येत्या 21ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.  

दिग्गज कलाकारांच्या भूमिका 

नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून ‘द्विधा’ बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या दोघांसोबत रेणूका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

बाप लेकीच्या नात्याची भावस्पर्शी गोष्ट 

‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ अवस्थेत अडकतं. ही भावना अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला हा टिझर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक निलेश नाईक यांनी व्यक्त केला.

‘द्विधा’ चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन निलेश नाईक यांनी केले आहे.  चित्रपटातील गीते गीतकार मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांची असून संगीताची जबाबदारी निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वे  यांनी सांभाळली आहे. निलोत्पल बोरा यांनी नेटफ्लिक्ससाठी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि प्रकल्पांवर काम केले आहे.  हंसिका, परीक, मयुरी पटवर्धन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट,श्रीधर अल्ले यांचे आहे  वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे, आकाश स्वजन सेनगुप्ता यांनी केले आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget