एक्स्प्लोर

Planet Marathi : ’प्लॅनेट मराठी'वर 30 जूनला झळकणार 'जून', चित्रपटाचं ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी अखेर 'जून' चित्रपट 30 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे घोषित केले असून या चित्रपटाचा ट्रेलरही आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याबरोबरीनेच 'प्लॅनेट मराठी ओटीटी, 'अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्लॅनेट मराठी सिनेमा'चा नवीन लोगोही प्रेक्षकांसमोर आला आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे - बायस यांच्यासह 'जून'च्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं, की अनेक महिन्यांपासून 'जून इन जून' च्या चर्चा रंगल्या होत्या. आता तर जून महिनाही संपत आला. कधी येणार आहे हा 'जून' प्रेक्षकांच्या भेटीला? आमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आता तरी 'जून' प्रदर्शित करा. प्रेक्षकांसोबतच आता कलाकारही 'जून'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आपल्या या मित्रमंडळींचा आणि प्रेक्षकांचा मान राखत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी अखेर 'जून' चित्रपट 30 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे घोषित केले असून या चित्रपटाचा ट्रेलरही आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याबरोबरीनेच 'प्लॅनेट मराठी ओटीटी, 'अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्लॅनेट मराठी सिनेमा'चा नवीन लोगोही प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांची ही प्रतीक्षा आता संपली असून चित्रपटप्रेमी लवकरच 'जून' प्लॅनेट मराठी सिनेमावर पाहू शकणार आहेत. 

'हिलिंग इज ब्युटीफुल' अशी टॅगलाईन असलेल्या 'जून' या चित्रपटाच्या ट्रेलरवरून साधारण अंदाज आला असेलच. नेहा पेंडसे - बायस आणि सिद्धार्थ मेनन यांचं  मैत्री पलीकडचं नातं यात पाहायला मिळणार आहे. सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस आणि ब्लू-ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू यांनी 'जून'ची निर्मिती केली आहे. नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे. तर जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शाल्मलीने संगीतबद्ध केले आहे. संवेदनशील कथानक लाभलेल्या 'जून'ने अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये सिद्धार्थ मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. 

जून'च्या प्रदर्शनाबद्दल आणि 'प्लॅनेट मराठी ओटीटी' च्या लाँचबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर सांगतात, '' माझ्या मित्र परिवाराची आणि प्रेक्षकांची 'जून'च्या प्रदर्शनाविषयी असलेली उत्सुकता मी समजूच शकतो. परंतु ही प्रतीक्षा आता संपली असून 'जून' ३० जून रोजी प्रदर्शित होत आहे. मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय, की प्लॅनेट मराठी ओटीटीचा शुभारंभ 'जून'सारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाने होणार आहे. आयुष्याला जगण्याची नवी दिशा देणारा हा चित्रपट आहे. आज ट्रेलरबरोबरच आम्ही प्लॅनेट मराठी सिनेमाचा लोगोही तुमच्या भेटीला आणत आहोत. आम्हाला आशा आहे, 'जून' प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल आणि या पुढेही आम्ही असाच दर्जेदार आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ.'' 

'जून'ची निर्माती आणि अभिनेत्री नेहा पेंडसे - बायस 'जून' विषयी सांगते, ''जून हा नक्कीच पठडीबाहेरील चित्रपट आहे. मला खूप आनंद होतोय, की 'जून'च्या निमित्ताने सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. निखिल महाजन याने त्याच्या भावना लिहून एक उत्तम काम केले असून त्याच्या भावनांना सुहृद आणि वैभवने जिवंत केले आहे. हा एक धाडसी विषय असला तरी भावनिक आहे, त्यामुळे दुःखावर हळुवार फुंकर मारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. प्लॅनेट मराठी खऱ्या अर्थाने या चित्रपटाला जागतिक स्थरावर प्रदर्शित करून योग्य न्याय देत आहे. यापेक्षा चांगले व्यासपीठ आम्हाला मिळूच शकले नसते.''

'जून'च्या प्रदर्शनाबद्दल सिद्धार्थ मेनन म्हणतो, '' एक कलाकार म्हणून हा चित्रपट आम्हा सर्वांसाठीच एक टर्निंग पॉईंट आहे. एक कलाकार म्ह्णून अधिक बारकाईने मला 'नील'च्या भूमिकेकडे बघता आले. प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठेतरी साध्यर्म असलेला हा विषय प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया येतात, आता याकडे आमची उत्सुकता लागली आहे. तसेच 'प्लॅनेट मराठी' ओटीटीच्या जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 'जून'चा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे, ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे.''

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget