एक्स्प्लोर

Marathi Movie : निपुण आणि वैदैहीची रोमॅंटिक केमिस्ट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘एक दोन तीन चार’ या नवीन चित्रपटाची घोषणा

Entertainment News : ‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Entertainment News : मराठी मनोरंजनविश्वात दिमाखात पाऊल टाकत एकाहून एक दर्जेदार चित्रपट घेऊन जिओ स्टुडिओज (Jio Studio) आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ (Ek Don Tin Char)  या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण जोडी म्हणजेच अभिनेता निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.     

एक, दोन, तीन, चार या चित्रपटाचं दिग्दर्शन वरूण नार्वेकर (Varun Narvekar) यांनी केलं आहे. मुरांबा या बहुचर्चित चित्रपटानंतरचा त्यांचा हा पुढील चित्रपट असणार आहे.   

तरूणाईची गोष्ट : 

निपुण आणि वैदेही या कथानकातील जोडपं आयुष्याच्या अगदी तरूणाईच्या म्हणजे साधारण 23 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतं आणि मग या जोडप्याबरोबरच त्यांच्या जवळच्या मंडळींचीही सुरु होते तारेवरची कसरत! या सर्व प्रवासात नक्की काय-काय घडणार हे प्रत्यक्ष चित्रपटात पाहणं उत्सुकतेच असणार आहे. 

‘एक दोन तीन चार’ बद्दल सांगताना चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणतात, “आजच्या तरुणाईला जो चित्रपट आवडेल, चित्रपटाची कथा त्यांना त्यांच्या जवळची वाटेल; असा चित्रपट करण्याची माझी इच्छा होती. कारण लग्न हा असा विषय आहे की, तो तुम्ही कुठल्याही वयात करण्याचा निर्णय घेतलात तरी त्यात गुंतागुंत असते आणि इथे तर आजकालच्या तुलनेत, अति लवकर लग्न करण्याचा निर्णय हे जोडपं घेतं. मला खात्री आहे की ही रोलरकोस्टर लव्हस्टोरी’ सर्वांनाच आपलीशी वाटेल.”

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, बहावा एंटरटेनमेंट आणि 16 बाय 64 प्रोडक्शन अंतर्गत, रणजीत गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी, निरज बिनीवाले, निर्मित 'एक दोन तीन चार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Embed widget