Mahesh Manjrekar : मराठीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर (Marathi director Mahesh Manjrekar) हे अनेक कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात. नुकताच त्यांच्या 'वेडात मराठी वीर दौडले सात' (Vedat Marathi Veer Daudale Saat Movie) या चित्रपटामुळे ते चर्चेत होते. मात्र, आता महेश मांजरेकर पुन्हा अडचणीत आले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात झालेल्या अपघातामुळे त्यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुणे सोलापूर (Pune-Solapur Road) महामार्गावरील यवत गावाजवळ चित्रपट दिगदर्शक महेश मांजरेकर आणि टेभुर्णीतील आश्रमशाळेचे संस्थाचालक कैलास सातपुते (Kailas Satpute) यांच्यात अपघात झाला होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी संस्थाचालक कैलास सातपुते यांच्याविषयी बदनामी करणारे वक्तव्य केले होते. या प्रकरणी माढा न्यायालयाच्यावतीने टेभुर्णी पोलिसांना महेश मांजरेकर यांच्याविरुध्द चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याबरोबरच पंढरपूरच्या माढा न्यायालयाने टेभुर्णी पोलिसांना त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


नेमकं काय होतं प्रकरण? 


टेभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर या दोघांच्या वाहनामध्ये पुणे सोलापूर महामार्गावर गेल्या वर्षी 2021 साली अपघात झाला होता. सदर अपघाता प्रकरणी सातपुते यांनी महेश मांजरेकर यांच्याविरूद्ध टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या दरम्यान महेश मांजरेकर यांनी सातपुते यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करुन प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद माढा कोर्टात दिली होती.त्यानुसार फिर्यादीची दखल घेत न्यायाधिश श्री.गांधी यांनी टेभुर्णी  पोलिसांना मांजरेकर यांचे विरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.


मांजरेकर यांनी सातपुते यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करून प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद माढा कोर्टात दिली होती. या तक्रारीची दखल घेत न्यायाधीश गांधी यांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


"वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Amitabh Bachchan: 'बँकेत एकही रुपया नव्हता, आर्थिक मदत करण्यासाठी धीरुभाई अंबानी पुढे सरसावले पण...'; अमिताभ बच्चन यांनी सांगितल्या आठवणी