एक्स्प्लोर

'बायबल के बारे में बात करनी थी...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...

Marathi Actress Swati Deval Told Incident Religious Conversion: अभिनेत्री स्वाती देवल हिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिनं तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबाबत सांगितलंय. अभिनेत्रीनं जे काही सांगितलं, ते ऐकून खरंच पुरतं हादरून जायला होतं. 

Marathi Actress Swati Deval Told Incident Religious Conversion: मुंबईतील (Mumbai News) अंधेरी स्थानकातला (Andheri Railway Station) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झालेला. एका प्रवाशानं हा व्हिडीओ रेकॉर्ड केलेला, त्यात दावा करण्यात आलेला की, एका वृद्धाकडून तरुणीचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू होता. या व्हिडीओमुळे प्रचंड मोठा गदारोळ झालेला. त्यावेळी अनेकांनी असाच अनुभव आपल्याला आल्याचं सांगितलं होतं. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीनं (Marathi Actress) एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिनं तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबाबत सांगितलंय. अभिनेत्रीनं जे काही सांगितलं, ते ऐकून खरंच पुरतं हादरून जायला होतं. 

मराठी मनोरंजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती देवल (Swati Deval) हिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. बोरिवली (पश्चिम) येथील गजबजलेल्या इंद्रप्रस्थ आणि मोक्ष प्लाझा परिसरात खरेदीसाठी गेली असताना अभिनेत्रीसोबत एक विचित्र, पण तितकाच धक्कादायक प्रकार घडला, त्याबाबत तिनं सांगितलं आहे.  

अभिनेत्री स्वाती देवल हिनं काय सांगितलं? (Swati Deval Share Video)

अभिनेत्री स्वाती देवल इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणाली की, "नमस्कार मी स्वाती देवल, मला एक गोष्ट सांगायची आहे. लहानपणी आपण शाळेत ऐकलं होतं, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत... खरोखरंच आपला देश असा आहे की, या देशात अनेक धर्म, जात आणि पंथाचे लोक राहतात. अगदी गुण्यागोविंदाने, एकत्र आणि प्रेमाने राहतात. पण असं आपल्याला वाटत होतं... आता बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्या आहेत. टीव्हीवरील बातम्या, अनेक प्रसार माध्यमांमधून बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. वाईट कर्म करणारी लोक आपल्या आजूबाजूला आहेत, हे आपल्याला दिसत असतं... पण, या गोष्टी दुसरीकडे घडत असतात, आपल्यापर्यंत येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला त्याची झळ पोहोचत नाही... पण माझ्याबरोबर एक घटना घडली..."

"बोरिवली (पश्चिम) इथल्या इंद्रप्रस्थ आणि मोक्ष प्लाझा परिसरात मी खरेदीसाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी तरुणीनं मला गाठलं. ती मला म्हणाली, मॅम मला तुमच्याशी बोलायचंय... अर्थात तिनं हे हिंदीत विचारलं. त्यावर मी तिला क्या? असं म्हटलं. तर ती म्हणाली, आपसे बायबल के बारें में बात करनी थी... क्या आप बायबल के बारें में जानना चाहोगे… मुझे आपसे बात करनी है. त्यावर मी तिला मुझे आपसे कुछ बात नही करनी... धन्यवाद... असं म्हटलं आणि मी तिथून निघून आले...", असं स्वाती देवल म्हणाली. 

पुढे बोलताना स्वाती देवल म्हणाली की, "मी तिथून पुढे गेले, तरी माझ्या डोक्यात विचार सुरू होता की, ही बाई अचानक असं का विचारतेय? चांगल्या घरातली मुलगी, साधारण 28-30 वयोगटातली... माझ्या डोक्यात सतत विचार सुरू होता की, का हिनं मलाच विचारलं? मी मागे वळून पाहिलं तर ती माझ्यावर लक्ष ठेवून होती आणि माझ्याच आसपास घिरट्या घालत होती... मी रागानं तिच्याकडे पाहिलं आणि रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेले..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swati Deval (@swati.deval)

अत्यंत संशयित त्या दोन बायका... : स्वाती देवल 

"रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं मी तिच्यावर गपचूप लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यावेळी मला असं दिसलं की, ती बाई तेवढ्या भागात फिरत होती. काही बायकांना थांबवून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. नंतर बऱ्याच वेळानं ती आणखी एका मुलीला भेटली... ती मुलगीसुद्धा अशीच सगळ्यांना भेटून येत होती... मग त्या दोघी एकमेकींशी बोलल्या, काहीतरी कानात कुजबुजल्या... अत्यंत संशयित त्या दोन बायका मला वाटल्या... माझं चुकलं की मी त्यांचा व्हिडीओ शूट केला नाही, मग माझ्या लक्षात आलं की, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे..."

VIDEO शेअर करत स्वातीचं कळकळीचं आवाहन

आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्री स्वाती देवल हिनं एक कॅप्शन शेअर केलंय. या कॅप्शनमध्ये तिनं सर्वांना कळकळीचं आवाहन केलंय. तिनं लिहिलंय की, "सावधान, काळजी घ्या, फसू नका. अशा लोकांशी बोलू नका. तुम्ही तुमच्या मतांशी, विचारांशी, हिंदुत्वाशी आणि तुमच्या धर्माशी एकनिष्ठ राहा. तुम्ही आपले आहात म्हणून ही गोष्ट सांगितली. जय भवानी, जय शिवाजी!"

दरम्यान, अभिनेत्री स्वाती देवल ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत स्वाती देवलनं नेहाच्या (प्रार्थना बेहरे) हिनीची भूमिका साकारली होती. ग्रे शेड असलेली ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. सध्या ती 'लक्ष्मी निवास' मालिकेत झळकतेय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Daniel Balaji Mother Leaves 80 Crore Bungalow: 'माझा मुलगाच जगात नाही, तर महाला काय कामाचा...'; सुपरस्टार लेकाच्या निधनानं आई खचली, 80 कोटींच्या बंगल्याचा त्याग करुन झोपडीत राहायला गेली

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
Embed widget