एक्स्प्लोर

प्रतीक्षा सोनालीच्या नव्या गाण्याची! टीजर आला.. गाणं शुक्रवारी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपलं नवं कोरं गाण लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येत असून या गाण्याचा टीझर लॉन्च झाला आहे. तर गाण शुक्रवारी रिलीज करण्यात येणार आहे.

मुंबई : लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार आपलं मन रमवण्यासाठी अनेक गोष्टी करत होते. यात कुणी स्वयंपाकघरात नवी काही शिकत होतं. तर कुणी एखाद्या कलेला आपलंसं करत होतं. या सगळ्यात सोनाली कुलकर्णी मात्र फारशी कुठे दिसली नाही. तुम्हाला आठवत असेल तर सोनालीचे फोटो दिसत होते पण काही नव्यानं करून पाहण्यात मात्र आलं नव्हतं. आता मात्र सोनाली कुलकर्णी काय करत होती हे समोर येणार आहे.

View this post on Instagram
 

दूर ठेव दृष्टी डोंगर रांगातून पार चालायचे आहे मैलं थकून नाही चालणार.. #tuchtujhisobati #comingsoon #apoeticvideo #sonaleekulkarni A @videopalaceindia release! Music @sagarmusical Recorded at @trivikramstudio Poetry @gourisarnaik Videography & Photography @yashkaklotar Poster designed by @posterwood.design @posterwood_branding

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

लॉकडाऊन लागला तेव्हा खरंतर सोनाली होती दुबईमध्ये. सोनाली कुलकर्णीचा नव्याने साखरपुडा झाला होता. आणि ती दुबईला गेली होती. तिकडे काही दिवसांसाठी म्हणून गेली आणि लॉकडाऊन लागला. त्यानंतर तिने तिकडचेच फोटो टाकले. पण केवळ फोटो टाकण्यावर तिने समानधान मानलेलं नाही. तर आता तिने तिकडं नक्की काय केलं हे गाण्यातून आपल्या समोर येणार आहे. सोनालीनं तिथे एक सिंगल तयार केलं आहे. त्याचे बोल आहेत तूच तुझी सोबती. सकारात्मक ऊर्जा देणारं.. प्रेरणादायी असं हे गाणं असून हे गायलंही सोनालीनेच आहे.

या गाण्याचा टीजर आज रिलीज झाला आहे. या गाण्यात सोनाली दिसतेच शिवाय दुबईतली सुंदर लोकेशन्सही दिसतात. लॉकडाऊनमुळे सगळीच मंडळी जिथे तिथे अडकून पडली होती. त्यामुळे हे गाणं चित्रित झालं आहे दुबईत. दुबईतल्याच सिनेमेटोग्राफरने ते चित्रित केलं आहे. संगीत आणि त्याचं मिक्सिंगही तिथंच झालं आहे. विशेष बाब अशी की, दुबईतलं उचं ठिकाण म्हणून ओळखला जाणारा जबैल जैस या टोकावर याचं चित्रिकरण झालं आहे. संगीत सागर पाटीलचं असून गीत गौरी सरनाईकचं आहे.

या गाण्याचा टीजर आज आला असून हे गाणं शुक्रवारी येणार आहे. हे सिंगल लोकांना आवडेल अशी आशा सोनाली व्यक्त करते. सोनालीने यापूर्वी गाण्याचा प्रयत्न कुठे केलेला नाही. त्यामुळे तिचे हे पहिलंच गाणं असेल. अर्थात हे गाणं असंही नसून ते कवितेचं अभिवाचन आहे असंही कळतं. सोनालीने लॉकडाऊनमध्ये नक्की काय केलं हे समजायला शुक्रवारची वाट पाहावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 
भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 
Lust Stories 3 Trailer: वासना, भावना अन् नात्याच्या आतल्या गोष्टी; Netflixच्या बहुचर्चित वेबसिरीजचा 2 मिनिट 19 सेकंदांच्या Trailerचा धुमाकूळ
वासना, भावना अन् नात्याच्या आतल्या गोष्टी; Netflixच्या बहुचर्चित वेबसिरीजचा 2 मिनिट 19 सेकंदांच्या Trailerचा धुमाकूळ
Deool Band 2 OTT: 100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?
100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?
Seema Haider Video: सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले,
सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले, "मागे...."

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Embed widget