मराठमोळ्या अभिनेत्रीने दाखवली होणाऱ्या नवऱ्याची झलक; ख्रिसमसला रोमँटिक पोस्ट; कोण आहे खऱ्या आयुष्यातील हिरो?
25 डिसेंबर रोजी नाताळाच्या दिवशी गायत्रीने पोस्ट शेअर करत तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे.

Gayatri Datar: मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं दिसतंय. नुकतंच प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी या अभिनेत्रींचे विवाह सोहळे चाहत्यांनी पाहिले. दुसरीकडे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचे साखरपुड्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. ती सिनेमेटोग्राफर हर्षद आत्मारामसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तर बिग बॉसफेम अभिनेता जय दुधाणेचंही लग्न झाल्याचं दिसलं. आता लग्नसराईच्या या यादीत अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) हिचं नावही जोडलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच गायत्रीने प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. गायत्रीने पहिल्यांदाच तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नाताळाच्या दिवशी तिने होणाऱ्या नवऱ्यासोबत एक रोमँटिक रील शेअर करत 'Meet my forever Santa' असं लिहित ही पोस्ट केलीय.
गायत्रीने शेअर केलेल्या या व्हिडिओला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. चाहते तिला कमेंट करत शुभेच्छा देत आहेत. दोघांची जोडी खूप गोड दिसत असल्याचाही चाहते म्हणतायत. अभिनेत्री गायत्री दातारने 'तुला पाहते रे ' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. नंतर ती वेगवेगळ्या प्रोजेक्टसमधून चाहत्यांच्या समोर आली. काही दिवसांपूर्वीच माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालेली आहे असा कॅप्शन देत गायत्रीने चाहत्यांना प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. पण तेव्हा तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा रिव्हिल केला नव्हता. त्यामुळे चाहत्यांना गायत्रीच्या खऱ्या आयुष्यातील हिरो कोण याची उत्सुकता लागून होती. अखेर नाताळाच्या दिवशी तिने हा व्हिडिओ पोस्ट करत आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिली.
गायत्रीचा समुद्रकिनारी रोमँटिक व्हिडिओ
गायत्रीने तिच्या जोडीदारासोबत समुद्रकिनारी हा रोमँटिक व्हिडिओ शूट केला आहे. गुलाबी साडी, मोकळे केस अशा अंदाजात ती तिच्या प्रियकरासोबत डान्स करताना दिसतेय.
View this post on Instagram
25 डिसेंबर रोजी नाताळाच्या दिवशी गायत्रीने पोस्ट शेअर करत तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. 'मीट माय फॉरेवर सॅन्टा ' असं लिहित व्हिडिओ शेअर केल्यानंतर श्रीकांतने या व्हिडिओवर कमेंट करत 'मला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट' असा रिप्लाय तिला केलाय. या व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय.
कोण आहे गायत्रीचा खऱ्या आयुष्यातील हिरो ?
गायत्री दातारने पोस्ट शेअर करत ' माझ्या आयुष्यातील सॅन्टाला भेटा ..' असं लिहीत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पुढे एंगेज असा हॅशटॅग वापरला आहे. अभिनेत्री गायत्री दातारच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव श्रीकांत चवरे आहे. IIT बॉम्बे मधून त्याचं शिक्षण पूर्ण झालं असून तो ड्रोन फोटोग्राफर आहे. श्रीकांत हा मुंबईचा असून त्याला ट्रॅव्हल आणि फोटोग्राफीची आवड आहे.























