Vikas Samudre Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, खळबळ माजताच झटक्यात चक्रं फिरली, पोलिसांनी शेवटच्या क्षणी...
Vikas Samudre Facebook Post: अभिनेत्यानं केलेल्या पोस्टखाली चाहत्यांकडून कमेंट्स पडल्या आणि त्यासोबतच ही पोस्ट पोलिसांकडे पोहोचली. पोलिसांनी तात्काळ अभिनेत्याशी संपर्क साधला.

Vikas Samudre Facebook Post: मराठमोळ्या अभिनेत्यानं (Marathi Actor) केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे (Facebook Post) अख्खी इंडस्ट्री तर हादरलीच. पण, त्यासोबतच चाहते आणि मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पायाखालची जमीनही सरकली. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता विकास समुद्रे (Actor Vikas Samudre) यानं फेसबुकवर एक पोस्ट केली आणि त्यामुळे खळबळ माजली. मराठी अभिनेता विकास समुद्रे (Marathi Actor Vikas Samudre) यानं फेबुकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट केली आणि खळबळ माजली. अभिनेत्यानं केलेल्या पोस्टखाली चाहत्यांकडून कमेंट्स पडल्या आणि त्यासोबतच ही पोस्ट पोलिसांकडे पोहोचली. पोलिसांनी तात्काळ अभिनेत्याशी संपर्क साधला. पण, प्रकरण काहीतरी भलतंच निघालं.
मराठी अभिनेता विकास समुद्र यानं फेसबुकवर "I am committing Suicide..." अशी पोस्ट केली. या पोस्टमुळे पोलीस दलात खळबळ उडाली. सायबर विभागाचे डीसीपी बजरंग बनसोडे यांनीही तातडीनं पावलं उललली आणि मुंबई पोलिसांनी त्वरित विकास समुद्रे याच्याशी संपर्क साधला. दरम्यान, अभिनेता सुखरुप असून त्यानं आत्महत्या करण्याचा अजिबातच प्रयत्न न केल्याचं समोर आलंय.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विकास समुद्रे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी पोस्ट अपलोड करताना अभिनेत्याकडून टायपिंग मिस्टेक झाल्याची बाब समोर आली. सध्या अभिनेता सुखरुप आणि सुरक्षित आहे. दरम्यान, आत्महत्या करत असल्याची पोस्ट व्हायरल होताच, मुंबई पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी स्वतः मराठी अभिनेत्याशी संपर्क साधलेला.
अभिनेत्याची आत्महत्येची पोस्ट, कमेंट्सचा पाऊस (Vikas Samudre Facebook Post)
मराठी अभिनेता विकास समुद्रेच्या फेसबुक अकाउंटवरुन आत्महत्या करत असल्याची पोस्ट करण्यात आली. त्यानंतर चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात आली. अभिनेत्याच्या काळजीनं अख्खं कमेंट सेक्शन भरुन गेलं. तसेच, अनेकांनी कमेंट करुन अभिनेत्याला समजावण्याचाही प्रयत्न केला.

"अडचण असू शकते, पण हा मार्ग योग्य नाही, प्लीज असं काही करू नका...", अशी कमेंट एका युजरनं केलीय. तर, "सर, काय झालं? काही प्रॉब्लेम असेल तर, आपण काहीतरी मार्ग काढू शकतो... एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नका...", अशी कमेंट आणखी एका युजरनं केलीय.
काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना मराठी अभिनेत्यानं त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबाबत भाष्य केलेलं. अभिनेत्याला काही वर्षांपूर्वी ब्रेन हॅम्रेज झालेलं, त्या काळातल्या कटू आठवणी अभिनेत्यानं शेअर केलेला. अशी वेळ कोणावरच येऊ नये. हा काळ माझ्यासाठी खूप वाईट होता, असंही अभिनेत्यानं पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलेलं.
दरम्यान, अभिनेता विकास समुद्रे याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, अभिनेत्यानं आजवर अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलंय. पण, खरी प्रसिद्धी 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमामुळे मिळाली. विकास समुद्रे यानं बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्यात.






















