Lalit Prabhakar Prahaar: चेहऱ्यावर राग, मनात बदल्याची भावना! ललित प्रभाकरला अजमल कसाबची भूमिका कशी मिळाली? म्हणाला, 'मला 2-3 वेळा फोन...'
Lalit Prabhakar on Terrorist Ajmal Kasab Role: ललित प्रभाकरला अजमल कसाब ही भूमिका कशी मिळाली, सांगितला किस्सा.

Lalit Prabhakar on Prahaar: 26/11 मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावर आधारीत 'प्रहार' (Prahaar) हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला आहे. दहशतवादी अजमल कसाबचा (Terrorist Ajmal Kasab) फाशीपर्यंतचा प्रवास आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची न्यायलयातील लढाई, ही सगळी पडद्यामागची गोष्ट या सिनेमातून सादर करण्यात आली आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, या चित्रपटाची प्रचंड चर्चा होत आहे. या कोर्टरुम ड्रामा (Court Drama) चित्रपटात अभिनेता राज कुमार रावने (Rajkumar Rao) उज्ज्वल निकम (Ujjwal nikam) यांची भूमिका साकारली आहे. तर, मराठी अभिनेता ललित प्रभाकरने (Lalit Prabhakar) दहशतवादी अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटातील कलाकारांचं विशेष कौतुक केलं जात आहे. ललित प्रभाकरने आपल्या भूमिकेत खरेपणा यावा, यासाठी जीव ओतून काम केलंय. ललित प्रभाकरला ही भूमिका कशी मिळाली? याबद्दलची माहिती त्याने एका मुलाखतीत दिली.
ललित प्रभाकरला दहशतवादी अजमल कसाब ही भूमिका कशी मिळाली? (Lalit Prabhakar Reveals How He Was Selected for Prahar)
ललित प्रभाकर सध्या 'प्रहार' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलिकडेच त्याने 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ललित प्रभाकरने 'प्रहार' या सिनेमाच्या संबंधित अनेक किस्से शेअर केलेत. यावेळी ललितने आपली दहशतवादी अजमल कसाब ही भूमिका साकारण्यासाठी कशी निवड झाली? याची माहिती दिली. 'एबीपी माझा'शी बोलताना ललित प्रभाकर म्हणाला की, 'ऑडिशन झाली. मला 2 सीन पाठवण्यात आले होते. मला वेळ मिळत नव्हता, किंवा तेव्हा माझी 'आरपार' नावाची फिल्म रिलीज झाली होती'.
'या सिनेमाचे प्रोमोशन सुरु होते. यासाठी मी फिरत होतो. मला या चित्रपटाच्या संदर्भात 2 - 3 फोन आले होते. अनमोल म्हणून आहेत, त्यांनी कॉल केला होता. मला वेळ मिळत नव्हता, मला ते म्हणाले की शूट करुन पाठवा. मी म्हणालो की, शूट करुन नाही पाठवू शकत. कारण मला नाही आवडत, त्या पद्धतीने शूट करुन पाठवायला. मी येतो ऑफिसला, असं त्यांना म्हणालो. कसाबसा मी ऑफिसला पोहोचलो. ज्या दिवशी मी सीन्स केले, तेव्हा तिथेच मला अविनाश सरांचा फोन आला. आपण अजून वेगळ्या पद्धतीने करु शकतो का? मला अभिनय आवडला आहे, असं ते म्हणाले. आपण अजून यात काय नवीन करु शकतो? म्हणून आम्ही अजूनही एक टेक घेतला. त्याच दिवशी रात्रीच्या वेळेस मला कळालं की, मी या सिमेमासाठी सिलेक्ट झालो आहे', असं ललित प्रभाकर म्हणाले. 'प्रहार' हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज झाला असून, सध्या प्रेक्षकांकडून या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:




















